ज्योती पतसंस्थेचे कार्य राज्याला आदर्श घालून देणारे – नामदेव ठोंबळ

  दिनदर्शिका प्रकाशन व सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेने कोपरगावच्या मुख्य कार्यालयात सौर उर्जा प्रकल्प उभा करून विज बिलात तब्बल ९० टक्के बचत केली जाणार आहे. ज्योती पतसंस्थेचे कार्य राज्यातील पतसंस्थाच्यापुढे नवा आदर्श घालुन देणारे असुन, सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करून नवा विक्रम केला आहे असे गौरवोद्गार कोपरगावचे सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी केले. 

 कोपरगाव येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या मुख्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्याचा शुभारंभ व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा सहायक निबंधक नामदेव ठोंबळ व कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके, व्हा. चेअरमन देवराम सजन, संचालक चंद्रशेखर भोंगळे, कारभारी जुंधारे, प्रभाकर पाटील, महेंद्र नवले, वाल्मीक भास्कर, मच्छिंद्र पठाडे, संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुरेश शिंदे, सह व्यवस्थापक सुनील क्षिरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲड. रविंद्र बोरावके यांनी ज्योती पतसंस्थेच्या कार्याची माहिती देताना म्हणाले की, ज्योती पतसंस्थेचं कामकाज जनहिताच्या दृष्टीने पारदर्शक केले जाते म्हणुनच संस्थेचा संपूर्ण कारभार प्रगतीच्या दिशेने चालतोय. कोपरगाव शहराला वैभव प्राप्त करून देण्यात ज्योतीचा मोलाचा वाटा आहे. असे सांगुन ज्योतीच्या पतसंस्थेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, ज्योती सहकारी पतसंस्थेचे कार्य अतिशय गुणवत्तेचे पारदर्शक असल्यामुळेच सन १९८८ पासून शुन्य एनपीए आहे. संस्थेचे चेअरमन रविंद्र बोरावके यांच्या कार्यपद्धतीवरून प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळते. ज्योती पतसंस्थेने केवळ संस्थेचा विकास केला नाही तर कोपरगाव शहरात सुशोभीकरण करुन शहराचाही विकास केला आहे. म्हणुनच कोपरगाव आज ग्रीन व क्लीन दिसते असेही ते म्हणाले. यावेळी विविध क्षेञातील मान्यवर, संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 ज्योती पतसंस्थेच्या एकुण ९ शाखा असुन ३१५ कोटींच्या ठेवी, २६० कोटींच कर्ज वितरण, शंभर टक्के कर्जवसुली, गेल्या ३७ वर्षांपासून शुन्य टक्के थकबाकी असलेली ही पतसंस्था सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन लोकाभिमुख कार्य करत आहे. म्हणूनच ज्योती पतसंस्थेचे कामकाज दिशादर्शक आहे. – रविंद्र बोरावके (चेअरमन)