श्रीरेणुका मल्टीस्टेट दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ :  बँकिंग क्षेत्रात आग्रगण्य असलेल्या, लाखोंच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या विविध सुंदर्भ युक्त तसेच बँकिंग व फायनान्स विषयी सविस्तर माहिती असलेल्या सन २०२४ च्या अद्ययावत दिनदर्शिकेचा  प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला आहे.       

श्री रेणुका मल्टीस्टेटच्या १६ हजार चौरस फूट क्षेत्र फळाच्या मध्यवर्ती अद्यावत कार्पोरेट कार्यालयाच्या भव्य वास्तू मध्ये साला बाद प्रमाणे आयोजित नवचंडी पुजा व तीर्थप्रसाद कार्यक्रमाचे औचित्य साधून या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री रेणुका भक्तानुरागी मंगल भालेराव, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, संस्थेचे संस्थापक चेअरमन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके,  प्रा.जनार्दन लांडे, विशेष लेखापरीक्षक नवनाथ ठोंबरे, संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक हरिश्चंद्र मोरे, पत्रकार महादेव दळे, चंद्रकांत गायकवाड या रेणुका परिवाराच्या हस्ते  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन  करण्यात आले.

या निमित्ताने दिवसभर असंख्य मित्र परिवाराने रेणुका आईसाहेबाच्या व नवचंडी यागाच्या दर्शनाचा लाभ घेऊन सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. श्रीक्षेत्र अमरापूरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, बाळासाहेब चौधरी, डॉ. अरविद पोटफोडे, माधव देशमुख, पाडूरग डफल, नंदू डोल्हे, सुनील रासने यांनी उपास्थती लावली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक ऍड.नितीन भालेराव, सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, ऍडमिन कार्तीक, दिनेश टकले, पोपट काळे आणि त्यांच्या सहकार्यानी सर्वांचे स्वागत केले. तर महिला पाहुण्यांचे आदरातिथ्य जयंती भालेराव यांनी केले.