श्री खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा रविवार पासून सुरु

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ :  ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव रविवार पासून उत्साहात सुरु झाला. या निमित्ताने परिसरातील हजारो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. चंपाषष्ठी नंतरच्या रविवारी खंडोबाची वार्षिक यात्रा भरविण्याची गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. यंदाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसापासून खंडोबा मैदानात बाल गोपालांसाठी महाकाय राहट पाळणे, झिग झॅक, ब्रेक डान्स, छोटी रेल्वे, ड्रॅगन, मौत का कुवा व इतर खेळण्याची दुकाने तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेत.

श्री खंडोबा देवाच्या अभिषेकाने यात्रा महोत्सवाचा शुभारंभ झाला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ह.भ.प. राम महाराज उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा नुकताच पार पडला.  पुढील रविवारी (दि.३१) येथे सोना मिया वली साहेब यांचाही वार्षिक यात्रा उत्सव असल्याने तोपर्यंत विविध व्यावसायिकांचा व मनोरंजन खेळ साहित्याचा मुक्काम येथेच रहाणार असल्याने हा यात्रोत्सव आठ दहा दिवस चालणार आहे.