काळे गटाचे कार्यकर्ते कोल्हे गटात दाखल

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ :   आमदार आशुतोष काळे गटाच्या तालुक्यातील चासनळी येथील असंख्य कार्यकत्यांनी कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. 

Mypage

 प्रारंभी चंद्रकांत सर्जेराव चांदगुडे यांनी प्रास्तविक केले. कोल्हे गटात प्रवेश केलेल्या सर्वश्री. प्रकाश बाळासाहेब गाडे, पवन शशिकांत चांदगुडे, राजेंद्र रंगनाथ माळी, विकास भाउसाहेब चांदगुडे यांचा सत्कार करण्यात आला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे याच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार असल्याचे प्रकाश गाडे यावेळी बोलतांना म्हणाले. 

tml> Mypage

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनेष गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहेर, कल्याणराव चांदगुडे, भाउसाहेब चांदगुडे, उपसरपंच मनोज गाडे, शरद गाडे, देविदास गाडे, राहुल चांदगुडे, बाबासाहेब चांदगुडे, सुनिल सुरभैय्या, रविंद चांदगुडे, विनायक गाडे, श्रीकांत चांदगुडे, सुखदेव माळी. हर्षद गाडे, बाळासाहेब घेनक, कैलास धेनक, ज्ञानेश्वर चेनक, भास्करराव पवार, विजय गाडे आदि उपस्थित होते. शेवटी संचालक मनेष गाडे यांनी आभार मानले.

Mypage