कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी आ.विवेक कोल्हे, मा.आ.स्नेहलता कोल्हे व जिल्ह्या बॅंकेचे बिनविरोध निवडून आलेले नुतन संचालक बिपीन कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळेंना विजयी करण्यासाठी एकत्रित येवून मतदान केंद्रावर आपल्या समर्थक मतदारांनाही सोबत घेवून मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आमदार आशुतोष काळेंना मताधिक्य वाढवण्याचे काम केले. कोल्हेंच्या सहकार्याने आमदारकी बरोबर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आमदार किळेंनी आपल्या विजयाचा विक्रम केला.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजनी नुकतीत पार पडली त्यात एक मदार काळे यांना ८८२ पैकी तब्बल ७५० मते मिळाल्याने विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव झाला आहे. आमदार काळे यांनी या निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. संपूर्ण जिलवह्यामध्ये आपली शक्ती व युक्ती पणाला लावून विजय खेचुन आणला त्या विजयाला चार चॅंद लावण्याचे काम कोपरगावमध्ये कोल्हे कुटुंबाने केले.

कोल्हे-काळे यांच्या राजकीय एकजुटीची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून बिपीन कोल्हे यांची सोसायटी मतदारसंघातून यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली असताना उर्वरित जागांसाठी होत असलेल्या मतदानात पॅनलच्या उमेदवारांच्या विजयासाठी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि बिपीन कोल्हे यांनी सोमवारी सकाळी आपल्या समर्थक मतदारांना एकत्रित घेत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावत आमदार काळेंसह आपल्या पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.

कोल्हे कुटुंबाने एकत्रितपणे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत कोल्हे कुटुंबाने आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.विशेष म्हणजे, राजकीयदृष्ट्या पारंपरिक विरोधक मानले जाणारे आमदार आशुतोष काळे यांना कोल्हे कुटुंबाने यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही कार्यकर्त्यांना मतदानाचे आवाहन करून महत्त्वपूर्ण सहकार्य करुन काळेंना विक्रमी मतानी निवडून आणले होते. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही कोल्हे कुटुंबाने आपल्या समर्थक मतदारांची ताकद सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभी केल्याचे चित्र दिसून आले.

बिपीन कोल्हे यांची बिनविरोध निवड आणि उर्वरित जागांसाठी मतदारांना एकत्रित घेऊन केलेल्या मतदान यामुळे कोपरगावच्या सहकार क्षेत्रातील कोल्हे कुटुंबाचे राजकीय वजन अधोरेखित झाले आहे. आपल्या विरोधकांशी राजकीय मतभेद असले तरी सहकाराच्या व्यापक हितासाठी भूमिका घेण्याची कोल्हे कुटुंबाची परंपरा या निवडणुकीतून पुन्हा चर्चेत आली आहे.मतदारांना एकत्रित घेऊन मतदान केंद्रावर दाखल होण्याचा कोल्हे कुटुंबाचा हा सामूहिक निर्णय जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा राजकीय क्षण ठरला.

काळे कोल्हेंची सहकारातील एकी राज्याला आदर्श घालुन देणारी आहे. राजकीय कट्टर विरोधक असलेले काळे कोल्हे हे अनेक निवडणुकांमध्ये पारंपरिक विरोधक असले तरीही सहकाराची पंढरी समजलेल्या कोपरगाव तालुक्यात सहकार टिकवण्यासाठी राजकीय मतभेद बाजुला सारून सहकारी संस्थानच्या निवडणुका एकमताने लढवून बिनरोध करतात त्यामुळे तालुक्यातील सहकारी संस्था काळे कोल्हेंच्या विचाराने तालुक्यात खंबीरपणे उभ्या आहेत.


