कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे योगदान आदर्शवत – सुप्रिया सुळे

Mypage

कर्मवीर स्व. शंकरराव काळे साहेबांना मान्यवरांकडून अभिवादन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : शिक्षण संस्था, कारखाना व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात काळे परिवाराचे योगदान जनता नेहमीच लक्षात ठेवील. पवार कुटुंब आणि काळे कुटुंबाचे कायमचे ऋणानुबंध असून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत दिलेले योगदान नेहमीच आदर्श राहील अशा भावना संसदरत्न खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केल्या.

Mypage

कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १० व्या पुण्यस्मरणार्थ त्यांना पुष्पांजली अर्पण करून खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी अभिवादन केले यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या उभारणीत स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना ज्या कुटुंबांनी साथ दिली त्यामुळे महाराष्ट्र पुढे गेला असून यामध्ये काळे कुटुंबाचे मोठे योगदान आहे.

Mypage

सहकार चळवळ जिवंत ठेवणे, टिकविणे आणि विकासात सर्वांना एकत्र घेवून महाराष्ट्र स्थापनेचा मंगलकलश स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आणला त्यामध्ये काळे कुटुंबाचे सातत्याने योगदान होते. समाज शिकला तर विकास होवू शकतो हे ओळखून ती ध्येय धोरणे त्यांनी प्राधान्याने राबविली. शेतकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी ठोस कार्यक्रम हाती घेवून काळे साहेबांनी सातत्य ठेवले.

Mypage

शिक्षण संस्था, कारखाना व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात काळे परिवाराचे हे योगदान जनता नेहमीच लक्षात ठेवील. तोच वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने पुढे चालविला जात आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे खा. सौ. सुपियाताई सुळे यांनी यावेळी सांगितले.

Mypage

यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी कारखाना, उद्योग समूह व सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव भांगरे, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त महेंद्र शेळके, अॅड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे,

Mypage

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे सर्व संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, सतीश कृष्णानी, बाळासाहेब कदम, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *