शेवगाव तहसील कार्यालयात रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : ग्रामीण परिसरातून दररोज मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात येणाऱ्या जनतेची विविध कामे वारंवार चकरा मारूनही मार्गी लागत नसल्याने आता कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न नागरिकाना पडला आहे. सध्या  तहसील कार्यालयातील विविध पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने  कामाचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.

Mypage

रिक्त पदे भरण्याबाबत महसूल विभागांच्या वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे समजते. तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची ४ पदे मंजूर असून सध्या एकमेव नायब तहसीलदार कार्यरत असून निवासी नायब तहसीलदार, संजय गांधी योजना व निवडणूक विभाग नायब तहसीलदार अशा तीन जागेचा प्रभारी पदभार एकाकडेच असल्याने विविध अत्यावश्यक कामांना न्याय देताना त्यांची मोठी दमछाक निदर्शनाला येत आहे.

Mypage

अव्वल कारकुनाची सात पदे मंजूर असून यापैकी पाच अव्वल कारकून कार्यरत असून त्यापैकी एक अव्वल कारकून सेवा वर्गात कार्यरत असल्याने अव्वल कारकुनांची तीन पदे रिक्त आहेत. महसूल सहाय्यकांची १४ पदे मंजूर असून यापैकी दहा महसूल सहाय्यक कार्यरत असून यापैकी एक महसूल सहाय्यक सध्या निलंबित असून महसूल सहाय्यकाची ५ पदे रिकामी आहेत. शिपायाच्या ४ पैकी दोन तर स्वच्छकाच्या २ पैकी एक जागा रिकामी आहे.  

Mypage

मंडलाधिकारीच्या ६ पैकी ५ जागा कार्यरत असून एक पद रिक्त आहे. तलाठी सवर्गाची मंजूर पदे ३८ असून यापैकी २८ पदे कार्यरत असून यापैकी एक तलाठी सध्या निलंबित असून १० पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयातील कामांचा वाढता व्याप लक्षात घेता रिक्त पदे तातडीने भरून जनतेची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी महसूल विभागाच्या वरीष्ठांसह मतदार संघाचे आमदार, खासदार तसेच महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री यांनीही लक्ष घालून जनतेला योग्य न्याय देण्याची मागणी होत आहे. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *