विखे पाटील कोपरगावचे पाहुणे आहे, तुम्ही ढवळाढवळ करू नका – जितेंद्र रणशुर

 एमआयडीसी श्रेयवादावरून पुन्हा वाद

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ :  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कोपरगाव तालुक्याचे जावाई आहेत तेव्हा पाहुण्यांनी पाहुण्यासारखे  रहावे. विखे पाटील यांनी कोपरगाव तालुक्याच्या राजकारणात ढवळाढवळ करुन राजकारणाचा अड्डा करु नये अशी टिका आरपीयचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी केली. 

शहरातील लुंबिनी बुध्दविहार येथे आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, पॅंथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष विलास आहीरे, क्रांती लहुजी सेवनाचे जिल्हाध्यक्ष फकिरा चंदनशिव यांच्या प्रमुख उपस्थितीत पञकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पञकाराशी संवाद साधताना जितेंद्र रणशुर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,  कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. माञ एमआयडीसी मंजूर केल्याचे श्रेय घेण्यासाठी चाढाओढ लागली आहे. या एमआयडीसी मंजुरी मध्ये युवा नेते विवेक कोल्हे यांचे मोठे योगदान आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना कोल्हे यांनी सोनेवाडी येथे एमआयडीसीसाठी जागा सुचवून पाठपुरावा केला होता. त्याच जागेला शासनाने मंजुरी दिली माञ आमदार आशुतोष काळे व विजय वहाडणे यांनी खुप उशिराने ज्या जागेमध्ये एमआयडीसी व्हावी म्हणून जागा सुचवली ती जागा प्रशासने नामंजूर केले यावरूनच कोल्हे यांना श्रेय जाते. 

विखे पाटील यांच्या घराण्याकडे  गेल्या ५० वर्षांपासून  घराण् मंञीपद, खासदारकी व जिल्हापरिषद अध्यक्षपद होते.  कोपरगाव लोकसभा मतदार संघाचे ३० वर्षे खासदार होते.  मग त्यांनी या पुर्वीचा तालुक्यासाठी एमआयडीसी का मंजूर करून आणली नाही. केवळ राजकीय अड्डा बनविण्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या जावयाने राजकीय ढवळाढवळ करू नये.  विखे हे मोठे मंञी आहेत त्यांनी मोठ्या मनाने कोपरगावच्या विकासाला मदत करावी. श्रेयवादाच्या लढाईत पडू नये असे म्हणत विखे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी  माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर निशाणा साधताना रणशुर म्हणाले की, विजय वहाडणे यांनी विकास कामात मिठाचा खडा पाण्याचे काम केले. कोल्हे यांच्यावर टिका करण्यापेक्षा स्वतःला तपासून पहावे. आपले वडिल हे खासदार, विधान परिषदेत उपाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तरीही एमआयडीसी का मंजूर करण्यासाठी ताकद लावली नाही.

काळे परिवाराकडे ५ वर्षं खासदारकी, मंञी पद, १५ वर्षे आमदारकी असुनही २० वर्षांपासून हा प्रश्न का सोडवू शकले नाही. कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेवून सत्कार करून घेण्याची सवय काळे यांना लागली आहे. असे म्हणत एमआयडीसी मंजुर करण्यांत कोल्हे यांचे योगदान असल्याने त्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विलास आहीरे  म्हणाले की, मार्च २०२० रोजी आमदार आशुतोष काळे यांनी एमआयडीसी साठी मागणी केली ती रांजणगाव येथे केली आहे. तेथील भोगवटादार ब वर्ग ही जागा  शासनाने नामंजूर करण्यात आली.  त्या पुर्वी  विवेक कोल्हेंनी चांदेकसारे व सोनेवाडी या भागात एमआयडीसी येथे होण्याची मागणी केली होती त्यामुळे एमआयडीसीचे श्रेय कोल्हेंना जाते. कोल्हे यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले. 

 आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील समृध्दी महामार्गाच्या  स्मार्ट सिटी ला विरोध करुन ती पळवून लावली. बंद पाईपलाईनने पाणी येणार होते त्याला विरोध करुन पाणी अडवले. एमआयडीसी  मंजुरीमध्त्याये काळे यांचा काहीही संबंध नाही . काळे यांची  कायम दुटप्पी भूमिका असते असा आरोप जितेंद्र रणशुर यांनी केला आहे.