कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोऱ्हाळे येथील श्री गणेश महाविद्यालयाच्या एकूण चार विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या पहिल्याच फेरीत निवड झाली. वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी नुकतीच पहिली यादी जाहीर झाली. त्यात श्रीगणेश महाविद्यालयाच्या आकाश जगताप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, ऋतिक चव्हाण छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर रितिका थोरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग व समाधान रौंदाळे तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबई येथे विद्यार्थ्यांची पहिल्याच फेरीमध्ये निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी बरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातही श्रीगणेश शिक्षण संस्थेचा झेंडा फडकविला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, नीट परीक्षेत आकाश जगताप 582, ऋतिक चव्हाण 579, समाधान रौंदाळे 554, रितिका थोरात 552, मयुरेश सलगट 550, श्रुती शिंदे 511 गुण मिळविलेले आहेत. पैकी चार विद्यार्थ्यांचा पहिल्याच फेरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झालेला आहे.
दुसऱ्या फेरीमध्ये उर्वरित दोन विद्यार्थ्यांचा एमबीबीएस प्रवेशाचा मार्ग देखील मोकळा आहे. श्रीगणेश शिक्षण संस्थेच्या तब्बल ६ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी नीट परीक्षेत ५०० पेक्षा जास्त गुण मिळविणे ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
प्राचार्य रियाज शेख, प्रा.सागर हिंगे,प्रा.प्रवीण दहे,प्रा.योगेश फटांगरे,प्रा.अमोल कोतकर,प्रा.गौरव लहामगे ,प्रा.पूजा चांदगुडे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे यांनी अभिनंदन केले.
कोविड प्रकोपाच्या काळात श्रीगणेश महाविद्यालयाने ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अध्यापन केले. प्रा.विजय शेटे यांचे प्रत्येक विद्यार्थ्याच्या पूर्वतयारीकडे बारकाईने लक्ष असते. मला मिळालेले यश हे शिक्षकांच्या परिश्रमाचे फलित असून मला माझे स्वप्न पूर्ण करण्यास “श्रीगणेश पॅटर्न” ची पुरेपूर मदत झाली. – आकाश जगताप (विद्यार्थी, श्रीगणेश महाविद्यालय)