अनुशेष भरून काढण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हाच ध्यास ठेवून गेले सात वर्ष आपण काम केले असून  मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलाआहे. विकास कामांना चालना देऊन जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असल्याचे आ.मोनिकाताई राजळे यांनी येथे सांगितले.
तालुक्यातील  लाडजळगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन आज त्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.

      राजळे म्हणाल्या, मध्यंतरीच्याअडीच वर्षात शासनाकडून निधी देताना दुजाभाव करण्यात आला, त्यामुळे रस्ते, पाणी आदींबाबत विकास खुंटला होता परंतु आत्ताच्या भाजप समविचारी सरकारच्या काळात मतदारसंघातील कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून रस्ते, पाणी योजना आदी कामांना सुरुवात झाली आहे. तालुक्यातील रुपये ७ कोटी ५० लक्ष  किमतीच्या विविध कामाचा शुभारंभ त्यांनी आज केला.

           यावेळी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापू पाटेकर, बाबागिरी महाराज, सूर्यभान महाराज आंधळे, सरपंच लताताई तहकीक, उपसरपंच दत्ता तहकीक, काकासाहेब तहकीक, पांडूकाका तहकीक, अंबादास ढाकणे,  सरपंच संजय खेडकर, केशव आंधळे, सरपंच राजेंद्र पोपळघट ,अशोकराव खिळे, यादवराव क्षीरसागर, राजू डमाळे, पांडुरंग तहकिक, लक्ष्मणआप्पा देवढे, लक्ष्मणराव तहकिक,  अविनाश राजळे, काजले महाराज, बाप्पासहेब तहकिक, शाखा अभियंता राठोड,

सुरेश घुले, ठेकेदार सोमनाथ शिंदे,प्रकाशमामा मार्कंडे, आबासाहेब तहकिक, अजितकाका मुळे, भाऊसाहेब बर्डे, वाघ मामा,    केदार पाटील, माणिक ढाकणे, भगवान पाटील, पांडुरंग शेलार, नवनाथ ढाकणे, इस्माईल पठाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   सुधाकर तहकीक यांनी सुत्रसंचलन केले .तर  कालिदास ढाकणे यांनी आभार मांनले.
        यावेळी  आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत लाडजळगाव येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर सभामंडप भूमिपूजन (रक्कम 20 लक्ष),  अर्थसंकल्पी तरतूद अंतर्गत रामा पन्नास मध्ये चापडगाव – ठाकूर पिंपळगाव रस्ता दुरुस्ती (रक्कम 210 लक्ष),  रा.मा. मध्ये राक्षी रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 155 लक्ष),  गदेवाडी  रस्ता दुरुस्ती करणे (रक्कम 155 लक्ष),  शेवगाव ताजनापूर रस्ता दुरुस्ती करणे (रक्कम 210 लक्ष) या कामाचा आज प्रारंभ  करण्यात आला.