विकास कामाच्या जोरावर डाऊच खुर्द मध्ये पुन्हा शिवसेना – नितीनराव औताडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : डाऊच खुर्द ग्रामपंचायतीमध्ये मागच्या पंचवार्षिक कार्यकाळात जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता संजय गुरसळ यांनी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना गावात राबविल्या रस्ते पाणी व वीज या संदर्भातील विकासात त्यांनी सातत्य ठेवले. त्यामुळेच जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेच्या नेहा संजय गुरसळ त्यांना लोकनियुक्त सरपंचपदी निवडून देत शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवली असे प्रतिपादन उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते नितीनराव औताडे यांनी केले.

ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी उमेदवार व किंग मेकर ठरलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करताना बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब राहणे, सरपंच अमोल औताडे, डाऊचे माजी सरपंच संजय गुरसळ, बाळासाहेब गुरसळ, मोहन गुरसळ, दादाभाई सय्यद, दिगंबर पवार, देवा पवार, बाबासाहेब गुरसळ अदी उपस्थित होते.

काळे कोल्हे परजणे व शिवसेना अशी चौरंगी लढत डाऊच खुर्द ग्रामपंचायती मध्ये झाली. त्यात सरपंच पदासह चार उमेदवार शिवसेनेने निवडून आणत आपले बहुमत पुन्हा एकदा सिद्ध केले असल्याचे संजय गुरसळ यांनी सांगितले. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचा नितिनराव औताडे व पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरपंच अमोल औताडे यांनी मानले.