कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत विवेक कोल्हे यांनी विविध प्रश्न मांडले

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या भावना मांडत पाट पाण्याचे आवर्तनांचे नियोजन काटेकोर करण्याची मागणी लाऊन धरली. रब्बीचे २ आवर्तन सोडले जाणार असल्याचा निर्णय झाला, असून उन्हाळी आवर्तना बाबत देखील योग्य निर्णय व्हावा.

Mypage

यासाठी लवकरच बैठक बोलवन्यात यावी अशी मागणी केली आहे. रब्बीच्या शिल्लक पाण्यातून उन्हाळी आवर्तन देखील वाढून मिळावे असाही आग्रह धरला आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठक या त्या त्या भागात घ्याव्या त्यामुळें शेतकरी आपल्या सूचना मांडू शकतात. निळवंडे कालव्याना अतिरिक्त १.५ टी एम सी पाणी सोडण्याचा आग्रह धरला असता त्यावर निर्णय झाला.

Mypage

गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आ. सत्यजित तांबे आदींसह नगर -नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवावे यासाठी आगामी अधिवेशनात मागणी लाऊन धरण्याचे व जायकवाडीला पाणी सोडून हक्काचे पाणी वाया जाऊ देऊ नये असे निवेदन देण्यात आले.

ज्यामुळे रांजणगाव व परिसरातील गावातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊन विवाद टळणार आहेत. शेतकरी वर्गावर कोणताही अन्याय न होऊ देता पाणी वाढून मिळावे व गोदावरी खोरे आणि निळवंडे लाभक्षेत्रधारक शेतकरी यांच्या पाण्याचे नियोजन सुरळीत होऊन आगामी काळात दुष्काळजन्य स्थिती असल्याने शेती आणि पशुधन यांच्याबाबत धोरणात्मक पावले उचलले जाण्याची विनंती केली आहे.

Mypage

पाटबंधारे विभागाचे कर्मचारी वाढवून मिळावे त्यामुळे पाणी वाटप नियोजन सुरळीत होईल. दीड पट पाणी पट्टी आकारणी करू नये व मागील थकबाकी वसुलीची सक्ती टाळून पाणी देण्यात यावे यासह पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवावे यासाठी आगामी अधिवेशनात भरीव निधीसाठी मागणी व्हावी व ८.५ टीएमसी पाणी जायकवाडीला जाऊ देऊ नये.

Mypage

यासाठी सर्वानुमते एकच वकील देऊन सदर पाणी सुटू नये. अशा आशयाचे ठराव करण्याची मागणी विवेक कोल्हे यांनी केलेली होती. सदर विषयाचे ठराव केले गेले असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. या वेळी समवेत व्हा. चेअरमन मनेश गाडे, संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, माजी संचालक अरुण येवले, शिवाजी वक्ते, विजय आढाव, निवृत्त उप कार्यकारी अभियंता बी.व्ही.सुराळे, अहीलाजी खैरे, तुषार विध्वंस आदींसह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *