संजीवनीला ओबीईची गोल्ड बन्ड रॅन्कींग – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : राष्ट्रीय पातळीवर आरवर्ल्ड इन्स्टिट्यूशनल रॅन्कींग फोरम (आर डब्ल्यु आय आर एफ) या स्वायत्त संस्थेने केलेल्या आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) रॅन्कींग २०२२-२३ च्या (परिणाम आधारीत शिक्षण क्रमवारी २०२२-२३) सर्वेक्षणात विविध निकषांच्या आधारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘गोल्ड बॅन्ड’ या वर्गवारीत समावेश केला असुन महाविद्यालयाला ‘ए’ ग्रेड दिली आहे.

राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत त्रयस्थ संस्थेने केलेल्या संजीवनी अभियांत्रिकीच्या मुल्यमापनामुळे या महाविद्यालयाची दर्जा व गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.  

कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण २०२० अंतर्गत परिणाम आधारीत शिक्षणाला (ओबीई) महत्व देण्यात आलेले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ  अॅक्रिडिटेशन (एनबीए) या स्वायत्त संस्थेने सुध्दा संस्थांचे मुल्यांकन करताना ओबीई वर भर दिलेला आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्वच पात्र शाखांनी एनबीए मानांकन प्राप्त केलेले असल्यामुळे आर डब्ल्यु.आय.आर.एफ चे सर्वच निकष संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुराव्यासह सादर केलेल्या अहवालावरून सिध्द झाले, आणि संस्थेला ए ग्रेड सह गोल्ड बॅन्ड ही वर्गवारी मिळाली.

            आर.डब्ल्यु.आय.आर.एफ प्रश्नावलीनुसार सर्वच उत्तरे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून पुर्ण करण्यात आली. यात प्रामुख्याने संस्थेत पीएचडी प्राद्यापकांची संख्या, संस्थेमार्फत विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या, कोविड १९ काळात संस्थेने ऑनलाईन टिचिंगसाठीच्या उपाय योजना, संशोधनाबाबत मिळविलेले पेटंट्स, विध्यार्थी व शिक्षकांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले प्राविण्य, पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उपाय योजना, अशा अनेक बाबींचा ५२ पानी अहवाल डाॅ. शैलेश पालेकर यांनी संस्थेचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही आॅटोनाॅमस संस्था असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार व उद्योग जगताच्या आवश्यकतेनुसार  नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे रॅन्कींग मिळविणे अधिक सोयीचे झाले.

 देशातील आय आय टी, एन आय टी सह ३५० अभियांत्रिकी संस्थांनी आर.डब्ल्यु.आय.आर.एफच्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे धाडस केले. यामध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने ए ग्रेड सह गोल्ड बॅन्ड ही वर्गवारी मिळविली. ही बाब संजीवनी ही संस्था ग्रामिण भागात असुनही कोणत्याही बाबतीत मागे, नाही हे पुन्हा सिध्द झाले.

 संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या या राष्ट्रीय पातळीवरील उपलब्धीबाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी डायरेक्टर डाॅ. ठाकुर, डाॅ. पालेकर यांचेसह सर्व विभाग प्रमुख यांचे अभिनंदन केले आहे.