संग्राम निवासी मुकबधिर विद्यालयात पालक मेळावा संपन्न

संगमनेर प्रतिनिधी, दि.०८ :  सोमवार दि.०६ नोव्हेंबर २०२३ रोजी संगम ग्रामविकास मंडळ, संगमनेर (संग्राम, संगमनेर) संचलित संग्राम निवासी मुकबधिर विद्यालय, संगमनेर येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संग्राम निवासी मुकबधिर विद्यालयातील माजी विद्यार्थिनी निशा पठाडे, ग्रामपंचायत सदस्य ढोलेवाडी, ता. संगमनेर, डॉ. रेश्मा शेटे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय उपस्थितीत होते. डॉ. रेश्मा शेटे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय यांनी विद्यार्थिनी यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या बाबत सविस्तर माहिती दिली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून मोठ व्हायला पाहिजे. तसेच शिक्षकांवर निष्ठा ठेवून शिक्षक जे सांगतील ते आपण समजून घेतले पाहिजे. आपण दिव्यांग आहोत हा मनातील न्यूनगंड प्रथमता काढून टाकला पाहिजे व आपण सक्षम आहोत. आपण इतरांपेक्षाही सजग आहोत. हे जनतेला दाखवून दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी महत्त्वकांक्षी राहून आपल्या जीवनात काम केले पाहिजे. आपण डॅशिंग वागले पाहिजे.

मला संग्राम निवासी मूक बधिर विद्यालयाने कसं जगायचं व किती चांगलं जगायचं हे मला या विद्यालयातूनच शिकायला मिळाले. अतिशय मेहनत माझ्यावर शिक्षकांनी घेतली त्याचा मला खूप मोठा फायदा झालेला आहे. तसेच लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केले माझ्याकडे एक सर्वसामान्य मुलगी म्हणून बघितले माझ्याकडे कधीही दिव्यांग म्हणून बघितले नाही. मी एक सर्वसामान्य मुलगी आहे. या भावनेतून माझी ढोलेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली. माझी येथील विद्यार्थ्यांना विनंती आहे.

आपण दुर्गुण बाजूला सारून चांगल्या गुणांची जोपासना केली पाहिजे. असे प्रतिपादन संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व ढोलेवाडी ग्रामपंचायतीची नवनिर्वाचित सदस्य निशा पठाडे भरीतकर हिने केले. संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय या ठिकाणी सत्कार समारंभ प्रसंगी केले. यावेळी तिचा फेटा बांधून व गुच्छ देऊन मुख्याध्यापक सुनील कवडे सर यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालायचे सामाजिक कार्यकर्ता आनंद अल्ले यांनी तर सूत्रसंचालन विशेष शिक्षिका अर्चना शिंदे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शेक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.