ग्रामसडक योजनेच्या २५ किलोमीटर रस्त्याचा सर्वे सुरु – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील २५ किलोमीटर रस्त्याचा सर्वे सुरु झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मतदार संघातील रस्त्यांसाठी विविध योजनेंतर्गत आ.आशुतोष काळे यांनी निधी आणून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. तसेच उर्वरित रस्त्यांना देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. मतदार संघातील रांजणगाव देशमुख-अंजनापूर-बहादरपूर ते जिल्हा हद्द रस्ता(इजिमा २११), वारी-कान्हेगावबिरोबा चौक ते संवत्सर (ग्रा.मा. १३३), सोनारी ते रवंदे जिल्ह हद्द रस्ता (इजिमा २१६), ओगदी-पढेगाव रस्ता (इजिमा ६) व मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा-नपावाडी राहाता रस्ता या एकूण २४.९०० किलोमीटर रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना देखील केलेला पाठपुरावा आजतागायत सुरूच होता.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी देण्यासाठी या रस्त्यांचा सर्वे सुरु करण्यात आला आहे. या रस्त्यांचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होवून या रस्त्यांचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.