गोदावरी कालव्यांना ४ आर्वतने देण्याचा निर्णय – विवेक कोल्हे

Mypage

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ :  गोदावरी कालव्यांना रब्बीचे एक तर उन्हाळयात तीन असे ४ पाटपाण्यांचे आर्वतन देण्यांचा महत्वाचा निर्णय महसुल तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

Mypage

           नागपुर विधानभवन येथे हिवाळी अधिवेशन सुरू असुन जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी कालवे सल्लागार समितीची बैठक घेतली. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, आमदार लहु कानडे, आमदार माणिकराव कोकाटे, जलसंपदा खात्यचे सचिव, नाशिक पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता गायकवाड, उपअभियंता मिसाळ यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी, शेतकरी आदि उपस्थित होते. 

Mypage

कोल्हे पुढे म्हणाले की, गोदावरी कालव्यांचे आयुर्मान शंभर वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे. त्याच्या नुतणीकरणाचे काम शिंदे फडणवीस शासनाने हाती घेवुन त्यासाठी मोठया प्रमाणात निधी देवुन निवीदास्तरावरील कामे चांगल्या पध्दतीने करण्याबाबतच्या सुचना दिल्या आहे, जी कामे निवीदास्तरावर आहेत त्याच्याही निवीदा अंतिम करून त्याचीही कामे तातडीने हाती घेतली जावी. गोदावरी कालवा पाण्याच्या आवर्तन काळात फुटणार नाही याबाबत अधिकाऱ्यांनी वेळीच नियोजन करावे, चालु वर्षी पर्जन्यमान चांगले झालेले आहे. 

Mypage

           बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना पुर्ण क्षमतेने कालवा आर्वतन काळात पाणी मिळावे यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाअंतर्गत कर्मचा-याचा तुटवडा आहे तेंव्हा हे कर्मचारी तातडीने भरून शेतक-यांना विना तक्रार रब्बीसाठी एक तर उन्हाळसाठी तीन आर्वतन द्यावी म्हणजे त्यांच्या शेत पिकांचे नुकसान होणार नाही. गोदावरी कालव्यावर बहुताष गावांच्या पिण्याच्या पाण्याच्याही योजना असून त्यांनाही व्यवस्थीतरित्या पाण्याचा पुरवठा व्हावा असे ते शेवटी म्हणाले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *