बहादरपूर ते रांजणगाव देशमुख व रवंदे ते सोनारी रस्त्यांसाठी ६.५० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव तालुक्यातील रा. मा. ३५ बहादरपूर ते रांजणगाव देशमुख व रवंदे ते सोनारी या दोन रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ६.५० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या खराब झालेल्या सर्वच रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी अनेक रस्त्याचे प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले आहेत.त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून नुकत्याच २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मतदार संघातील नऊ रस्त्यांसाठी २५.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे रस्ते विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे.

मतदार संघातील प्रत्येक खराब रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी सततचा पाठ्पुरावा सुरु असतो. या पाठपुराव्यातून मतदार संघातील दोन महत्वाच्या रस्त्यांना देखील नुकतेच मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत ६.५० कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील रा.मा. ३५ बहादरपूर ते रांजणगाव देशमुख या जवळपास ५ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी ११ लक्ष ९० हजार व रवंदे ते सोनारी अंदाजे ०३ किलोमीटर रस्त्यासाठी २ कोटी ३८ लक्ष ७९ हजार असा एकूण ६.५० कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न सुटला आहे. बहादरपूर, रांजणगाव देशमुख, रवंदे, सोनारी व परिसरातील नागरिकांनी निवडून आल्यानंतर या रस्त्यांच्या दुरुस्तीची केलेली मागणी पूर्ण करू शकलो याचे मोठे समाधान मिळत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

लवकरच या रस्त्यांच्या कामाची निविदा प्रकिया पार पडून या रस्त्यांच्या कामास प्रारंभ होणार आहे. मागील अनेक वर्षापासून बहादरपूर, रांजणगाव देशमुख, रवंदे, सोनारी व परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तत्ता होणार आहे त्यामुळे या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.