संजीवनीच्या विकासात कर्मचा-यांचा मौलिक सहभाग – बिपीनदादा कोल्हे

Mypage

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. ११ : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामविकासाला सर्वोच्च प्राधान्य देते कोपरगांव पंचक्रोशीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची निर्मीती करून त्यातुन विकासाची संजीवनी फुलविली त्यात सर्व घटकाबरोबरच कर्मचा-यांचा देखील मौलिक सहभाग असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

Mypage

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेचे कर्मचारी शांताराम घायतडकर सेवानिवृत्त झाले त्याबददल त्यांचा शुक्रवारी निरोप समारंभ सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. 

tml> Mypage

   याप्रसंगी सौ. शालीनी शांताराम घायतडकर, चिरंजीव अक्षय शांताराम घायतडकर, कल्यानी पोपट घायतडकर, कमलेश प्रल्हाद काकळीज व लेखा शाखेचे सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Mypage

       प्रारंभी मुख्य लेखापाल एस. एन. पवार प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अभ्यासू अध्यक्ष विवेक कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी पंचक्रोशीच्या विकासाबरोबरच कामगारांच्या प्रश्नांत सातत्याने लक्ष घातले आहे. सेवानिवृत्ती नंतरही कर्मचा-यांनी कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी.

Mypage

सहायक मुख्य लेखापाल प्रविण टेमगर म्हणाले की, संगणकीय कामकाजाअगोदरच शांताराम घायतडकर यांनी संस्थेच्या लेखा जमाखर्चाची तंतोतंत मांडणी करून कामावर नितांत श्रध्दा ठेवली. याप्रसंगी वाल्मीक कळस्कर, मच्छिंद्र भुसे यांनी भाषणातून घायतडकर यांच्या कामाची प्रशंसा केली.

Mypage

सत्कारास उत्तर देतांना शांताराम घायतडकर म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे या तालुक्याला परिसस्पर्श लाभले त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळेच गोर गरीबांच्या जीवनांत आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत. सुत्रसंचलन आभार लक्ष्मण वर्पे यांनी मानले. 

Mypage