निलकंठ कराड यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यकारीणी सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ निलकंठ भगवान कराड (वय-५९) यांचे शुक्रवारी (दि.१८) ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर शेवगाव येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कै. कराड यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये जवळपास ३० वर्षे काम केले असून, पत्रकारांच्या विविध प्रश्नासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले आहेत.त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजई, पुतणे असा परिवार आहे. येथील राष्ट्रीय स्वयंसेवक तालुका संघचालक डॉ. सुनिल कराड यांचे ते बंधू होत. 

ReplyReply allForward