चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०३ : वारंवार माहिती विचारली असता ती न देता उलट चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, तसेच त्या संबधित अन्य मागण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण काथवटे यांनी १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालया समोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिक्षक यांना दिले आहे.

Mypage

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, काथवटे यांनी माहितीच्या अधिकारात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत शहरातील खंडोबा माळ ते पंचायत समिती समोरील पाण्याची टाकी, यांना जोडणारी जी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली, तीची माहिती अनेकदा मागितली होती. अखेर तीची माहिती न देता दुसऱ्याच पाईप लाईनची माहिती देवून आपली दिशाभूल करण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे.

Mypage

आपण विचारणा करत असलेली ती पाईपलाईन चोरीला गेली की काय अशी शंका त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केली असून या पाईप लाईनची माहिती काथवटे यानी नगर परिषदेकडे मागितली होती. मात्र त्यांनी तर ही पाईप लाईन नगरपरिषदेने टाकली नसल्याने त्यांच्या कडे तीच्या विषयी काहीच माहिती नसल्याचे सांगून घोंगडे झटकले आहे.

Mypage

दोन वर्षा पूर्वी झालेल्या या पाईप लाईनच्या सर्व कामाचे इस्टीमेट, ना हरकत, इंजिनियर कॉम्पिटिशन सर्टिफिकेट, सर्व कामाच्या फोटोसह व ठेकेदारास अदा केलेल्या रकमेबाबत माहिती मागितली आहे. तथापि हेतू पुरस्कर ही माहिती पंचायत समितीने देण्यास टाळाटाळ केली. शेवटी लेखी स्वरूपात दुसऱ्याच पाण्याच्या पाईपलाईनची माहिती दिली आहे.

Mypage

तरी महोदय नम्र विनंती की या पाईपलाईनची फाईल शोधून काढावी व सदर माहिती मला द्यावी. तसेच या कामावर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर, चुकीची माहिती देणाऱ्या अधिका-यावर, देखील त्वरित कारवाई करावी. कारण ही पाईपलाईन होऊन देखील शेवगावला कुठलाही फायदा झालेला नाही.

Mypage

आजही शेवगावला १४ / १५ दिवसाला पाणी येते. त्यामुळे ही पाईपलाईन फक्त ठेकेदार व शासकीय अधिकारी यांना आर्थिक फायदा मिळवून देण्याकरता झाली की, काय याची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या इंजिनिअरने ही पाईपलाईन सुचवली, या कामाची पाहणी केली, त्या इंजिनिअर वर कारवाई होऊन ठेकेदारास ब्लॅक लिस्टेड करणे गरजेचे आहे. तसेच हे काम होत असताना, नगरपरिषद क्षेत्रामध्ये ठेकेदाराने जेथे काम केले, त्या ठिकाणचे सर्व रस्ते व पेव्हीग ब्लॉक उखडून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु नंतर रस्त्याची कुठलीही डागडुजी ठेकेदाराने केलेली नाही.

Mypage

पत्रव्यवहार करुन देखील नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याकडून ही डागडुजी करून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या

Mypage

अधिकाऱ्यावर देखील हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कारवाई करावी. असे शेवटी नमुद करून अन्यथा १५ ऑगस्टला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आयुक्त जिल्हाधिकारी आदींना देण्यात आल्या आहे. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *