‘योजना आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त ठरणार – आशुतोष काळे

योजना आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘योजना आपल्या दारी’उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी शनिवार (दि.०४) रोजी सुभाषनगर येथील श्री लक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी ‘शासकीय योजना आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी आ. आशुतोष काळे यांनी भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र या शासकीय योजनांसाठी पात्र असतांना देखील अनेक पात्र लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात.

त्यामुळे अशा पात्र असणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची उपलब्धता वेळेत होवून त्यांना लवकर लवकर सुलभपणे या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला.  

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,  माजी नगरसेवक मंदार पहाडे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, एकनाथ गंगूले, अक्षय आंग्रे, बाळासाहेब सोनटक्के, राजेंद्र आभाळे, सोहिल कुरेशी, वाजीद कुरेशी, ऋषीकेश धुमाळ, सचिन शिंदे, राजेंद्र मरसाळे, नदीम कुरेशी, शेखर डहानके, निलेश शिंदे, अझर खाटीक, किशोर चव्हाण, बंटी चावरे, प्रविण चौधरी आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.