५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आमदार काळे

Mypage

अधिकारी व ठेकेदारना सूचना

Mypage

     कोपरगाव प्रतिनधी, दि. ७ : कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागणार असून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

tml> Mypage

आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून सुरु असलेल्या ५ नं. साठवण तलावाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, कोपरगाव शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमस्वरूपी दूर व्हावे यासाठी १३१.२४ कोटी निधीतून ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम सुरु आहे.

Mypage

आजपर्यंत साठवण तलावाचे खोदाईचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून २२ किलोमीटरची पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बेट भागाच्या पाण्याच्या टाकीचे ८० टाके काम पूर्ण झाले आहे. ब्रिजलाल नगरच्या पाण्याच्या टाकीचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे हि समाधानाची बाब आहे. हे काम दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी या कामाची गती वाढविणे अत्यंत गरजेचे असून पावसाळ्याच्या आत बहुतांश काम पूर्ण होईल याची काळजी घ्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाईप लाईन टाकणे आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी पाईप लाईन टाका नागरिकांच्या तक्रारी येवू देवू नका अशा सूचना दिल्या.    

Mypage

  तसेच या बैठकीत समृद्धीच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील चर्चा करून समृद्धी महामार्गामुळे ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यापैकी बहुतांश रस्त्यांची आजवर दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी एम.एस.आर.डी.च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सूचना देवून लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

Mypage