भरधाव ट्रकमधून रस्त्यात पडल्या ऊसाच्या मोळ्या, थोडक्यात वाचला मोटार सायकल स्वार

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : शेवगावच्या क्रांती चौकात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या जुगाडाचा काल क्रांती चौकात अँक्सल तुटून अपघात झाल्याने त्यातील दीड टन उसाचे नुकसान झाले. तर आज त्याच ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरलेल्या ट्रकच्या साखळ्या ढिल्या झाल्याने दोन टनावर उसाच्या मोळ्या खाली पडल्या. 

Mypage

यावेळी ट्रक मागे असणारे मोटार सायकल स्वार सुदैवाने वाचले. मात्र शेतकऱ्याच्या दोन टनावर उसाचे नुकसान झाले. वाहतुकी दरम्यान अशा प्रकारे होणाऱ्या शेतकऱ्याच्या नुकसानीला वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने ऐराणिकर आला आहे.

Mypage

      यावेळी ट्रक चालकाने मात्र ट्रक न थांबवता भरधाव वेगाने नगर रस्त्याला पलायण केले. चौकात पोलीस नसल्याने तो आडवण्याचा प्रयत्न झाला नाही. ट्रकमधून मागे ऊस गळत असतानाही त्याने ट्रक थांबवून तो व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न केला नाही. शेतकऱ्याच्या स्थळातून ऊसाने भरलेल्या या ट्रकमध्ये कारखान्यापर्यंत किती ऊस गेला असेल याचा शोध घ्यायला हवा. अशी भावना यावेळी नागरिक व्यक्त करत होते.

Mypage

ट्रक मधून उसाच्या बेवारस मोळ्या रस्त्यावर पडल्या तेव्हा त्या घेऊन जाण्याची अनेकांची एकच धांदल उडाली. ज्याला झेपेल तेवढे ऊस जो-तो घेऊन जात होता. तर कित्येक ऊसाच्या मोळ्या रहदारीतील अन्य वाहनाच्या खाली सापडल्याने त्या उसाची तेथेच चिपाडे झाली. 

Mypage