शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या आपत्ती जनक बेताल विधानाचा येथील वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुक्याच्यावतीने चांगलाच समाचार घेण्यात आला. वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली शहराच्या क्रांती चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून त्याचे दहन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे, रवींद्र निळ, कैलास तिजोरे, गणेश भिसे, शफिक शेख, विष्णू वीर, असलम पठाण, गोरख तुपविहिरे, रज्जाक सय्यद, सागर गरुड, गुलाब पटेल, दादासाहेब गाडेकर, भीमा गायकवाड, बाळू गरुड, अशोक गायकवाड, हाजी मोहम्मद, हनीफ तांबोळी, विष्णू गायकवाड, सोनू हुसेन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .