पालीकेने केलेले अतिक्रमण पालीक काढणार का? – अॅड रविंद्र बोरावके 

अतिक्रमण मोहीमेच्या चिंतेने नागरीकांची उडाली झोप

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यासह इतर अनेक रस्त्यावरील नागरीकांनी केलेले अतिक्रमण पालीका प्रशासन काढणार असल्याचे जाहीर केली त्याचे स्वागत आहे. माञ खुद पालीकेने शहरातील मुख्य रस्त्यावर व्यापारी संकुल, व्यावसायीक पक्के गाळे बांधून अतिक्रमण केले आहे ते आगोदर काढणार का? असा सवाल ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा भाजपचे नेते अॅड रविंद्र बोरावके यांनी  थेट पालीका प्रशासनाला केला आहे.

 कोपरगाव शहरात लवकरच अतिक्रमण मोहीम राबनवणार असल्याचे कोपरगाव नगरपालीकेच्यावती जाहीर करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यासह उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अनेक ठिकाणी मोजमाप करुन फुल्या मारण्यात आल्या रहदारीला अडथळा असलेले सर्व रस्ते मोकळे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायीकांची झोप उडाली आहे.

हातावर पोट असणाऱ्या अनेक व्यवसायीकांची  रोजीरोटी या अतिक्रमण मोहीमेतून हिरावली जाणार आहे. अशातच भाजपचे प्रांतिय सदस्या व ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अॅड रविंद्र बोरावके यांनी पालीकेच्या अतिक्रमण मोहीमेचे स्वागत केले. माञ त्यांनी अंत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे कि, कोपरगाव नगरपालीकेने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी दोन व्यापारी संकुल बांधले आहेत ते संकुल मुख्य रस्त्यावर आहे.

रहदारीला मुख्य अडथळा येथे सर्वात ज्यास्त आहे तेव्हा पालीका प्रशासन सर्वात आगोदर स्वतः केलेले हे अतिक्रमण काढावे मगच इतरांच्या अतिक्रमणाला हात लावावा. केवळ पैसे कमावण्यासाठी पालीकेचे भर रस्त्यात व्यापारी संकुल पञ्याचे गाळे व इतर अनेक प्रकारचे अतिक्रमण करुन रहदारीला अडथळे केल्याने नागरीकांचा श्वास गुदमरतोय. नगररचना विभागाच्या नियमांचे खरे उल्लंघन खुद पालीकेने केले आहे.

 शहरातील टिळकनगर येथे रस्त्याला अडथळा होईल असे गाळे तयार केले. अनेक ठिकाणी पक्के गाळे बांधून केवळ महसुल गोळा करीत आहे. पालीकेने नागरीकांना जो नियम लावला तोच नियम स्वत:ला लावला पाहीजेत या अतिक्रमण मोहिमेत जर पालीकेने स्वत:चे  अतिक्रमण नाही काढले तर मी कोर्टात  जावून दाद मागणार असल्याचे सांगितले.

रविंद्र बोरावके यांच्या या प्रतिक्रीयेने पालीचा प्रशासनाची गोची होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य गोरगरीब  जनतेला अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली ञास देवू नये. अतिक्रमण काढायचेच असेल तर सर्वांचे काढा अन्यथा कोणावर अन्याय करू नका. शहराची बाजारपेठ नक्कीच फुलली पाहीजे पण ठराविक लोकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावे अन्यथा कायदेशीर लढाई लढून पालीका प्रशासनाला कोर्टात खेचणार असेही शेवटी बोरावके म्हणाले.

 कोपरगाव नगरपालीकेच्यावतीने शहरातील शेकडो नागरीकांना अतिक्रमण काढण्यासाठीच्या  नोटीसा दिल्या आहेत. नोटीस दिल्यापासून सात दिवसांत अतिक्रमण  काढून नाही घेतले तर जेसीबी फिरवण्याचे आदेश दिले आहेत.