कोपरगाव प्रतिनिधी, दि.३१ : तिन महीण्याचा गर्भ पोटात असताना वेदना सुरु झाल्या कोपरगाव येथील एका डाॅक्टराने गर्भपात केला. दोन दिवसाने पुन्हा पोट दुखतंय म्हणून दुसऱ्या डाॅक्टरांकडे संबधीत महीला गेली. तिथे तिच्यावर दुसऱ्या डाॅक्टरने थेट पोटाची शस्त्रक्रिया केली. तरीही वेदना कमी झाल्या नाहीत शेवटी लोणीच्या प्रवरा हाॅस्पिटलमध्ये हालवण्याच्या सुचना डाॅक्टराने दिल्या आणि दुर्दैवाने लोणी येथे उपचारा दरम्यान महीलाचा मृत्यू झाल्याने तीन लहान मुली आनाथ झाल्या आहे.

सविस्तर माहीती अशी की, कोपरगाव तालुक्यातील ब्रामणगाव येथील अर्चना माधव शिंगाडे वय ३६ वर्षे सदर महिलेला तीन लहान मुली असून ती चौथ्यांदा गर्भवती होती. तिचा गर्भापात झाला आणि चार दिवसांत उपचार दरम्यान महीलेचा मृत्यू झाला.

शनिवारी दुपारी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या दारात मयत महिलेच्या मृतदेहासह शेकडो नागरीक जमा झाले. अचानक गर्दी पाहुन पोलीस कर्मचारी व अधिकारी चक्रावले. नक्की काय घडलंय, महीलांचा आक्रोश सुरु होता. पोलीसांनी न्याय द्यावा अशी मागणी करीत उपस्थित नागरीकांनी ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये येवून माहीती घेतली.

अर्चना माधव शिंगाडे या गर्भवती महीलेचा गर्भपात चुकीच्या पध्दतीने केल्यामुळे तीचा मृत्यू झाला आहे. संबंधीत डाॅक्टरावर त्वरीत गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईक व समाज बांधवांनी केली. पोलीस निरीक्षक मथुरे यांनी घटना क्रम समजून घेतला व कायदेशीर बाबी उपस्थितांना समजावून सांगितल्या त्यामुळे नातेवाईकांनी सदर महिलेच्या मृतदेहावर ब्राम्हणगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

दरम्यान शहरातील एका डाॅक्टराने गर्भपात करुन महीलेच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. काही दिवस उपचार केले. पत्नीवर योग्य उपचार केले असं समजून घरी गेले पुन्हा वेदना सुरु झाल्यानंतर डाॅक्टराने सोनाग्राफी करून तपासणी केली पण विषेश काही नाही असे सांगितले त्यानंतर पुन्हा वेदना सुरू झाल्या नंतर सदर महिलेचा पती माधव प्रभाकर शिंगाडे यांनी शहरातील एक सर्जनकडे घेवून गेले तिथे पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली उपचार झाला पण गुण नाही आला असंच काही झालं.

संबंधीत महीलेला अधिकचा ञास जाणवू लागल्याने शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॅक्टराने सांगितले की, पुर्वीच्या डाॅक्टराने गर्भपात करताना चुकल्यामुळे महीलेला ञास होतोय असं म्हणत लोणीला जाण्याचा सल्ला दिले तिथे गेल्यानंतर शुक्रवारी राञी पत्नीचा मृत्यू झाला आणि शवविच्छेदन केलेल्या रिपोर्टनुसार चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाला अशी माहीती मयत महीलेचा पती माधव शिंगाडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले माञ कोणत्याही डाॅक्टरांच्या विरोधात दिवसभरात तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची वेगवेगळी चर्चा रंगली आहे.
