ग्रामीणची लोकसंख्येनुसार अंतिम प्रारूपमध्ये बदल
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या कार्यालयाच्या वतीने निश्चित करण्यात आली. गट व गणांमध्ये समावेश असलेल्या गावांची नावांचा मसुदा जाहीर करण्यात आला. कोपरगाव ग्रामीणची लोकसंख्येनिहाय तीन गावांच्या गट-गणात अदलाबदल करण्यात आला आहे.

डाऊच खुर्द, घारी हे आधी शिंगणापूरमध्ये होते ते आता पोहेगाव बु.गटात व चांदेकसारे गणात तर जेऊर कुंभारी हे आधी पोहेगाव बु. गटात व चांदेकसारे गणात होते ते आता शिंगणापूर गट-गणात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रारूप यादीच्या वेळी पूर्वीच्या चांदेकसारे गटाचे नाव बदलून पोहेगाव बु करण्यात आले होते. आता गट गणाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तालुक्यात सुरेगाव, ब्राम्हणगाव, संवत्सर,शिंगणापूर व पोहेगाव बु. असे पाच गट आहेत. गट व एक गटामध्ये दोन गणनिहाय समाविष्ट गावे खालीलप्रमाणे—सुरेगाव गट – सुरेगाव गण -सुरेगाव, वेळापूर, हांडेवाडी, मायगाव देवी, कारवाडी, मंजूर -धामोरी गण -धामोरी, रवंदे, चासनळी, वडगाव, बक्तरपूर, सांगवीभुसार, मोर्वीस, मळेगावथडी, सोनारी यांचा समावेश आहे.

ब्राम्हणगाव गट –ब्राम्हणगाव गण—ब्राम्हणगाव, खिर्डी गणेश, धारणगाव, येसगाव, टाकळी, नाटेगाव. करंजी बु.गण—दहेगाव बोलका, पढेगाव, शिरसगाव-सावळगाव, तिळवणी, आपेगाव, ओगदी, आंचलगाव, बोलकी, गोधेगाव, करंजी बु.कासली.

संवत्सर गट –वारी गण – वारी, धोत्रे, भोजडे, लौकी, खोपडी, कान्हेगाव, तळेगाव मळे, घोयेगाव, उक्कडगाव. संवत्सर गण –संवत्सर, सडे, कोकमठाण. शिंगणापूर गट –शिंगणापूर गण –शिंगणापूर, मुर्शतपूर, डाऊच बु.,चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, जेऊर कुंभारी,. कोळपेवाडी गण –कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, मढी बु.,हिंगणी, कोळगावथडी, कुंभारी, शहाजापूर.

पोहेगाव बु. गट –चांदेकसारे गण –चांदेकसारे, मढी खु. देर्डे चांदवड, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच खुर्द, घारी, सोनेवाडी, वेस-सोयेगाव पोहेगाव बु. गण –पोहेगाव बु. पोहेगाव खु.मनेगाव, रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, अंजनापूर, जवळ्के, बहादरपूर, बहादाराबाद,शहापूर, काकडी, मल्हारवाडी या गावांचा समावेश आहे.
