अतिवृष्टीचे संकटात कोल्हे कुटुंबाचा सेवा हाच धर्म 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : मतदारसंघात आलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरले उभी पिक पाण्याखाली गेली आणि स्वप्न मातीमोल झाले. अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांची अन्नपाण्याची गैरसोय झाली होती. या परिस्थितीची माहिती घेत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेले हे संकट दुर्दैवी असून शेतकरी आणि नागरिकांना झालेले नुकसान शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही.झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी परिस्थितीची तीव्रता जाणून घेतली असून प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तिथे मदतीसाठी यंत्रणा द्यावी यासाठी सूचना केल्या आहेत.संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने देखील विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक मदतीसाठी उपलब्ध आहे.

कोपरगाव मतदारसंघ अतिशय संकटात अडकला असून अतिवृष्टीमुळे अनेकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी स्थानिक शाळा,महाविद्यालय, सभागृह या ठिकाणी तात्पुरते निवारा व्यवस्था करावी.अनेक गावांचा संपर्क ओढे नाले यांना पाणी असल्याने बंद झाला आहे त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्याची देखील भावना व्यक्त करण्यात आली आहे. संजीवनी उद्योग समूह मतदारसंघावर आलेल्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम कार्यरत असतो आणि सेवा हाच धर्म या भावनेने कोपरगाव मतदारसंघ हे आपले कुटुंब आहे या दृष्टिकोनातून सेवा देण्याचं काम करतो. 

Leave a Reply