कोपरगांव प्दिरतिनिधी, दि. २४ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर जळगांव, नंदुरबार, नाशिक, पाथर्डी, पाचोरे, चाळीसगांव, बीड आदि ठिकाणांहुन मोठ्या प्रमाणांत उसतोडणी कामगार आले असुन त्यांच्या मुला मुलींना बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण मिळावे या उददेशांने थळातच साखर शाळा सुरू करण्यांत आली असुन कारखान्याच्यावतीने या मुलांना वही, पेन, पाटी पेन्सील, खोडरबर आदि शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यांत आले.

प्रारंभी मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उसतोडणी कामगारांच्या मुलांमध्ये शिक्षणाचा खंड पडु नये यासाठी त्यांच्या मुलां-गुलीसाठी हंगाम संपेपर्यंत शासन, साखर संघ, आयुक्त कार्यालय व कोल्हे कारखाना यांच्या सहकार्याने शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असुन त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेत आहे.

जिल्हा परिषद शाळा सहजानंदनगर व स्टेशन रोड शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हरेकल, श्रीमती आशा गवळी हे सहकारी उपशिक्षकांना दररोजच्या शिकवण कामाची विभागणी करतात त्याप्रमाणे शिक्षक प्रदिप भगवान साळवे व त्यांचे सहकारी त्यांच्या दैनंदिन शाळेच्या कामकाजाव्यतिरिक्त स्तर निश्चिती चाचणी करून दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत उसतोडणी कामगारांच्या मुला-मुलींना त्यांच्या इयत्तेनुसार पाढे, गणित, संख्याज्ञान, पाठयपुस्तके, शुध्दलेखन, वाचन, इंग्रजी वाचन, कविता गायन, श्रुत लेखन आदि अभ्यास घेतात.

गावांकडुन साखर कारखान्यांच्या थळावर उसतोडणीसाठी आई-वडीलांबरोबर त्यांची लहान मुले येण्याचे प्रमाण मोठे आहे. शिक्षणाबरोबरच त्यांना अवांतर सामान्यज्ञानही शिकवले जाते. शिकविलेल्या अभ्यासातुन त्यांच्या लेखी तोंडी परिक्षाही घेतल्या जातात असे ते म्हणाले. कार्यकमाचे सुत्रसंचलन आभार उपशेतकी अधिकारी सी. एन. वल्टे यांनी केले.


