संजीवनी युनिव्हर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांची आयआयटीमध्ये इंटर्नशिपपसाठी निवड                                     

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ६ एप्रिल २०२६ : संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये तृतिय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड  इंजिनिअरींग मध्ये शिकत असलेल्या समिर प्रदीप जाधव व युवराज संजय विखे यांची तीन महिण्यांच्या इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), वारानसी येथे निवड झाली आहे.

संपुर्ण देशातून या इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यात मर्यादीत विद्यार्थ्यांनाच संधी मिळते. अशा  स्पर्धात्मक निवडीमध्ये संजीवनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली, यामुळे या निवडीला विशेष महत्व आहे. संजीवनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे संजीवनीच्या दर्जा आणि गुणवत्तेची सिध्दता समोर आली आहे.

तीन महिण्यांच्या इंटर्नशिप कालावधीमध्ये या दोनही विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था आयआटी मार्फत करण्यात येणार आहे. आयआयटीने सर्व प्रथम इंटर्नशिपसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून सर्व तपशिलांसह अर्ज मागविले होते. यानंतर जाधव व विखे यांनी प्राद्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसह अर्ज तयार करून आयआयटीकडे पाठविले. त्यात प्रामुख्याने एआय स्किल्स, कॉम्प्युटर व्हिजन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, अशा  विविध बाबींचा समावेश  होता.

आयआयटीचे निकष दोघांनीही पूर्ण केले आणि त्यांची निवड झाली. तीन महिने ते शासकीय अनुदानीत प्रोजक्टवर संधोधनात्मक काम करतील. त्यांचे  इंटर्नशिपचे मुख्य कार्यक्षेत्र ‘बायोमेडीकल सिग्नल अँड  इमेज प्रोसेसिंग’ हे असणार आहे. त्यांना आयआयटीचे प्राद्यापक जॅक फ्रेडो एआर यांचे मार्गदर्शन  लाभणार आहे. या इंटर्नशिपचा फायदा त्यांना भविष्यात  नोकरीसाठी होणार आहे.

  संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले तर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी दोनही विद्यार्थ्यांचा त्यांच्या निवडीबध्दल सत्कार केला. यावेळी व्हाईस चांसलर डॉ. ए.जी.ठाकुर, डीन डॉ. कविथा राणी, संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी व प्रा. ज्योतीमई कलिथा उपस्थित होते.

  संजीवनी विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित असून, विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानविषयक प्रगल्भतेसाठी येथे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणूनच दोन्ही विद्यार्थ्यांची आयआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.- अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

Leave a Reply