कोपरगावची स्नेहल आहेर झाली जीएसटी सहाय्यक अधिकारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२६ : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोपरगावची कन्या कु.स्नेहल अशोक आहेर हिने उत्कृष्ट यश संपादन करत जीएसटी सहाय्यक अधिकारी पदावर नुकतीच नियुक्ती मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. स्नेहल आहेर तसेच तिचे आई वडील यांचा मा.आ. स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या स्नेहल आहेर हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण कोपरगावकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार सोहळ्यात काढले.

सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्नेहलने हा टप्पा गाठला असून तिच्या या प्रवासात वडील अशोक आहेर व आई यांचा खंबीर पाठिंबा लाभला. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत तिने जीएसटी सहाय्यक अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. यावेळी कु. स्नेहल आहेर हिचा सन्मान स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिनदादा कोल्हे, अतुल सुराळकर, किरण गायकवाड तसेच ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply