कोपरगांव प्दिरतिनिधी, १५: नाशिक पाटबंधारे खात्यांने नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज भरण्याबाचत शेतक-यांना नुकतेच आवाहन केले आहे. मात्र गोदावरी उजवा व डाव्या कालव्याच्या कार्यालयात संबंधी विभागाचे जबाबदार अधिकारी भेटत नसल्याने शेतक-यांची ससेहोलपट होत आहे तेंव्हा ऑनलाईन जमान्यात शेतक-यांचे पाणी मागणी अर्जही ऑनलाईन स्विकारण्यांत यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या मागणीत पुढे म्हटले आहे की, गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांचे आर्युमान ११९ वर्षाचे झालेले आहे. त्याच्या नुतणीकरणाची कामे सुरू आहे. ब्रिटीशकालीन कामे खिळखिळी झाल्याने शेतक-यांना प्रत्येक आर्वतन काळात कालवा फुटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षी पर्जन्यमान जेमतेम झाले, बारमाही गोदावरी कालव्यांच्या भरोशावरच या भागातील शेतकरी पीकपाणी परिस्थितीचे नियोजन करत असतो, विहीरींच्या अल्पशा पाण्यांवर उन्हाळ पिकांचे नियोजन सध्या सुरू आहे.
मात्र दोन आर्वतनांत जास्तीचा कालावधी पडल्याने शेतक-यांचे पिकाचे नुकसान होत आहे, ऐन मोसमात पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे उत्पादनांत घट होत आहे. सात नंबरवर पाणी मागणी अर्ज मागविण्यांत आले पण संबंधीत सिंचन शाखेत प्रशासकीय यंत्रणा भेटत नाही परिणामी शेतक-यांना सातत्यांने हेलपाटे मारावे लागत आहे.
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, बहुतांष जलसंपदा विभागाचे कामकाज संगणकीकरण झाले आहे तेंव्हा शेतक-यांचे पाणी मागणी अर्जही ऑनलाईन स्विकारून त्याच्या शेतीला होणारा पाण्याचा पुरवठा त्याचे वेळापत्रक, कालवा आर्वतनाच्या तारखा, त्याच्याकडील सिंचनाची बाकी, फळबागा व अन्य पिकाबाबतची संपुर्ण माहिती शेतक-यांना त्याच्या भ्रमणध्वनीवर पुरवून जलसंपदा विभागांने व नाशिक पाटबंधारे खात्याने त्यात गतीमानता आणावी, जेणेकरून शेतक-यांनाही पाटपाणी पीकपध्दतीबाबत नियोजन करणे सोईचे होईल असेही कोल्हे शेवटी म्हणाले.