शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : ख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज करण्याचा प्रयत्न महिला करत आहेत. योजनेचा फायदा घरबसल्या पात्र व गरजू महिलांना घेता यावा, यासाठी शेवगावचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी मोबाइलवरून अर्ज कसा भरावा हे समजावून सांगणारा व्हिडीओ तयार केला आहे. सोशल मीडियावर तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्यात, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. यासोबत हा अर्जभरताना कोणत्या पायऱ्या आहेत. त्यात नेमकी कोणती माहिती भरावी, याबाबत त्यांनी स्वतः अत्यंत सहज सोप्या भाषेत समर्पक माहिती दिली आहे. त्याचा महिलांना नक्कीच फायदा होतआहे. याकामी त्यांना भूषण कुलकर्णी, सुधा कुलकर्णी, रामनाथ रुईकर यांचे सहकार्य लाभले आहे.
घरबसल्या मोबाइलवरून हा अर्ज कसा भरावा, याबाबत गटविकास अधिकारी कदम यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. यामुळे महिलांचा वेळ, श्रम आणि पैशाचीही बचत होणार आहे. या उपक्रमा बद्दल गरजू महिलांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.