एकाच दिवशी दहा हजार बेरोजगारांना बड्या कंपनीमध्ये थेट नोकरी – विवेक कोल्हे 

कोल्हे परिवार बेरोजगारांसाठी नवसंजीवनी ठरणार 

 कोपरगाव प्रतिनिधी दि. २४: कोपरगाव मतदार संघातील उच्चशिक्षितांची वाढती बेरोजगारीमुळे हैराण झालेल्या युवक – युवतींसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी विद्यापिठाच्यावती ५ऑक्टोबर २०२४ रोजी संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करुन मतदार संघातील बेरोजगारांना एकाच दिवशी तब्बल दहा हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा संकल्प असल्याचे मत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. 

 विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी पञकार परिषद घेवून कोल्हे यांनी हि माहीती दिली.  यावेळी ते पुढे म्हणाले, कोपरगाव विधानसभा मतदार संघात १८ ते ३० वयोगटातील तब्बल ६० हजार सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम नसल्याने तसेच गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधींनी रोजगार निर्मीतीसाठी कोणताही प्रयत्न केला नाही.

उलट गुन्हेगारी वाढवली माञ संजीवनीच्या माध्यमातुन येत्या ५ऑक्टोबर २०२४ रोजी शनिवारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज भक्त निवास एक व दोन या ठिकाणी संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवात राज्यासह देश विदेशातील विविध क्षेञातील शंभर नामांकित कंपन्याचे प्रमुख येणार असुन एकाच दिवशी परिचय, मुलाखती व नोकर भरती  प्रक्रिया पुर्ण करुन थेट दहा हजार पदांसाठी बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी संधी देणार आहे. यामध्ये विविध शैक्षणिक पाञता व विविध पदांसाठी हि भरती असणार आहे. विशेषतः दिव्यांगानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. 

ज्यांची नियुक्ती झाली नसेल त्यांना संजीवनीच्यावतीने जाॅबकार्ड देण्यात येणार असुन त्यांनाही अवघ्या काही दिवसांत नोकरी देण्याची व्यवस्था संजीवनीच्यावती केली आहे. तेव्हा गरजू, होतकरु, सुशिक्षित, उच्चशिक्षित युवक युवतींनी या नोकरी महोत्सवात सहभाग नोंदवण्यासाठी www.sanjivanijobfair.co  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरभरुन  क्युआर कोड स्कॅन करावा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करावा. अर्ज भरण्याची मुदत ४ ऑक्टोबर पर्यंत आहे. तसेच महोत्सव ठिकाणी सुध्दा व्यवस्था संजीवनीच्यावतीने  करण्यात आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच मुलाखती देण्यासाठी येणाऱ्या समस्या सुटण्यासाठी आगोदर अर्ज करणाऱ्यांना संजीवनी विद्यापीठाच्यावतीने विशेषतः कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

  आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतक्या बड्या कंपन्यांसाठी इतकी मोठी नोकरी भरती करण्याचा हा महोत्सव जिल्ह्यात प्रथमच भरवण्यात आला आहे. मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी येणारे उद्योग घालवून बेरोजगारांना रोजगार देण्या ऐवजी अवैध  व्यवसाय करण्यासाठी बळ देतात पण संजीवनी उद्योग समुह गेल्या अनेक वर्षांपासून हजारो युवक युवतींना नोकऱ्या देवून जनहिताचे खरे कार्य करीत आहे. संजीवनी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातुन गेल्या पाच वर्षांत साडे सहा हजार सुशिक्षित बेरोजगारांना  देश विदेशात नोकऱ्या दिल्या. एक जबाबदार नागरिक म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे सशक्तीकरण करण्याचे काम सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी  नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे असेही विवेक कोल्हे म्हणाले. 

हा  ऐतिहासिक नोकरी महोत्सव भरवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हे परिवार मेहनत घेत आहे. मतदार संघातील तरुणाईच्या हाताला काम नसल्याने  ते अवैध व्यवसायातून गुन्हेगारीकडे वळू नये. मतदार संघातील घराघरांमध्ये अर्थीक सुबत्ता नांदावी यासाठी नोकरी महोत्सवाचे  आयोजन केले असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले तसेच या नोकरी महोत्सवात ज्यास्तीत ज्यास्त बेरोजगारांनी सहभाग नोंदवण्याचे आवहान कोल्हे  यांनी केले. या प्रसंगी संजीवनी नोकरी महोत्सव २०२४ घ्या संकेत स्थाळाच्या व नोकरी संदर्भात सविस्तर माहीती देणाऱ्या क्यु आर कोड च्या पञकाचे प्रकाशन विवेक कोल्हे व  त्यांच्या समवेत पराग संधान, किरण रहाणे, दिपक पवार, पञकार राजेंद्र सालकर, युसुफ रंगरेज यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

 कोपरगाव मतदार संघातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळण्याची नामी संधी थेट घरापर्यंत येवुन टेकवण्याचे कार्य कोल्हेंनी  केल्याने आता कंपनीत काम मिळवण्यासाठी बाहेरगावी जावून रांगा लावण्याची गरज लागणार नाही उलट कोल्हेंनी एकाच दिवशी देशातील नामवंत  शंभर कंपन्यातील १० हजार नोकऱ्या कोपरगावच्या दारात उभ्या करुन  सुशिक्षित बेरोजगारांच्या जीवनात नवसंजीवनी आणली.