तिजोरीत पैशाचा खडखडाट अन योजना आणि घोषणांचा गडगडाट – जयंत पाटील

शेवगाव प्रतिनिधी,  दि. २७ :  सध्याच्या भाजपा युतीच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वाढ झाली असून आता कॉन्ट्रॅक्टर वर्गाच्या आत्महत्या महाराष्ट्रात सुरु होतील, कारण तिजोरीत पैशाचा खडखडाट असतांना मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर काढल्या जात आहेत. अनेक योजना आणि घोषणा जाहीर केल्या जात आहेत. सरकारने रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे सव्वा लाख कोटीचे कर्ज मागितले आहे.  म्हणजे जाता जाता हे दहा लाख कोटी पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर कर्ज करायला कमी करणार नाहीत, म्हणून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात. म्हणजे जनताच त्यांना त्यांचा रस्ता दाखवील असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

शिव स्वराज्य यात्रा गुरुवारी सायंकाळी शेवगाव दाखल झाली. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. दुपारी एक वाजताची सभा तब्बल सात उशिराने सुरु झाली. यावेळी खा. अमोल कोल्हे, खा. नीलेश लंके, महेबुब शेख, राजेंद्र फाळके, विधिज्ञ प्रताप ढाकणे, तालुकाध्यक्ष हरिष भारदे, शिवशंकर राजळे, माजी आमदार संजय वाघचौरे, संदीप वर्पे, सुनील गव्हाणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, आदी उपस्थित होते.    

यावेळी  पाटील म्हणाले अफगाणिस्तानातून आलेल्या अब्दाली शहा याने भारतात पानिपत येथे येऊन मराठी फौजांचा पराभव केला, हे शल्य मराठी माणसाला आजही मनात आहे. सरकारने अफगाणिस्तानातून पानिपतला कांदा आणला आणि कांद्याचे दर आता परत कोसळायला लागलेत. म्हणजे आमच्या कांद्याचे पानिपत करण्याचं काम पुन्हा एकदा भा ज पच्या दिल्लीच्या सरकारने केले आहे. येथून चार किलोमीटर अंतरावर धरण  असूनही पंधरा दिव साने  नळाला पाणी सुटते . येथील शेतकऱ्याना पीक विमा सर्वात कमी मिळाला, लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्याने हे घडले.

खासदार नीलेश लंके म्हणाले, महविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यावर शेवगावचा पाणी व ताजनापूरचा प्रश्न प्रध्यानानाने सोडवू  महेबुब शेख यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. खा. कोल्हे म्हणाले, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती, पावसामुळे ती सभा रद्द झाली. पावसाला  घाबरणारी ढेकळ पाण्यात विरघळून जातात. खर तर पुणेकर आश्वासनांच्या पावसापासून वाचले. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी टीका करत खासदार  कोल्हे यांनी सरकारच्या योजनांवर निशाणा साधला. राज्याच्या राजकारणाने कुस बदलली आहे असेही ने म्हणाले.