राधाकृष्ण विखे मंत्री म्हणून सातव्यांदा घेणार शपथ

राहाता प्रतिनिधी, दि. १४ : राज्यात नावाने स्थापन झालेल्या सरकारमध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघात आठव्यांदा विधानसभा सदस्य  म्हणून निवड होण्बयाचा बहुमान मिळवणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून रविवारी १५ डिसेंबर  होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात नाव निश्चित झाले असून मंत्री म्हणून ते सातव्यांदा शपथ घेणार असल्याने ‘मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्याचा मंत्री म्हणून’ हे बोल कानावर ऐकण्यासाठी विखे पाटील समर्थक उत्सुक झाले आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या आनंद सोहळ्याचा जल्लोष करण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील विखे पाटील समर्थकांना उत्कंठा लागली आहे.

     २४ नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत मिळाल्याने निवडणुकीनंतर महायुतीच्या विजयी झालेल्या उमेदवारांनी आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून आपल्याला चांगले खाते मिळावे यासाठी सध्या दिल्ली व मुंबईत राजकीय खलबत्ते सुरू आहे. असे असले तरी अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत एकुण १२ जागे  पैकी १० विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठे यश मिळाले आहे व हे यश मिळवण्यासाठी किंग मेकरची भूमिका बजावणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती म्हणून ओळख असणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप पक्षाच्या सर्वच नेत्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला एक हाती सत्ता दिल्याबद्दल ना. राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील याचे अभिनंदन करत राधाकृष्ण विखे पाटील यांना भेट म्हणून पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्याचे निश्चित झाले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याच्या सरकारमध्ये सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. १९९७ साली शिवसेनेकडून त्यांना प्रथमच कृषी मंत्री, जलसंधारण, दुग्ध व पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय तसेच २००९ मध्ये शालेय शिक्षण, विधी व न्याय व संभाजीनगर जिल्ह्यात पालकमंत्री पुन्हा सन २००९ ला परिवहन, बंदरे तसेच विधी व न्याय २०१० कृषी व पणन तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, २०१४ ते १९ विरोधी पक्षनेते २०२० गृहनिर्माण व २०२२ महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री असे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी  १९९७ ते २०२४  या कार्यकाळात ६ वेळेस कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्यात उत्कृष्ट कामकाज पाहून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला असल्याने आता त्यांची सातव्यांदा मंत्री म्हणून निवड  निश्चित झाली आहे. 

शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांनी दहावीतील अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता एटीकेटीचा निर्णय, ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन, २६/११  च्या बॉब हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना १२वी पर्यंत मोफत शिक्षण, इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी विषय सक्तीचा, बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वाने जिल्हा परिषद शाळा इमारतीचा विकास हा अहिल्यानगर जिल्ह्याचा पॅटर्न राज्यात स्वीकारला गेला. कृषी व पणन खात्याचे मंत्री असताना १९९८ देशातील अंतरराष्ट्रीय स्तरावरचे ऍग्रो एडवांटेज  प्रदर्शनाचे आयोजन, राज्यात सर्वप्रथम कृषी विभागात एक खिडकी योजनेची अंमलबजावणी, कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नीना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय, फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना प्राधान्य, २०१४ मध्ये नागपूर येथे आंतरराष्ट्रीय वसंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानची माहिती व्हावी म्हणून शेतकऱ्यांना परदेश दौरायचे आयोजन.

परिवहन खात्याची जबाबदारी पार पाडताना शालेय स्कूल बससाठी महाराष्ट्र राज्यात प्रथम धोरण, राज्यात सेमी लक्झरी, आरमदायी व शिवनेरी वातानुकूलित गाड्यांची निर्मिती, तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक, बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मोडकळीस आलेल्या बस स्थानकाचे व आरटीओ कार्यालयाचे नूतनीकरण,  महसूल व पशुसंवर्धन विभागात मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताना देशात प्रथमच शिर्डी येथे शेकडो विविध उच्च प्रकारच्या जातीचे जनावरांचे तसेच पक्षांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन. सामान्य जनतेला ६०० रुपये ब्रासने वाळू देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ४ रुपये अनुदान, दीड कोटी पशुधनाचे मोफत लंम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण, राज्यस्तरीय कुकुट समन्वय समितीचे गठन, लोणी राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन, शेती महामंडळाची वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून विना मोबदला शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय,

शिर्डी येथे पशु वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार, जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे कालव्याद्वारे पाणी सोडून शेकडो गावातील पाणी साठवण तलाव भरून गावांची पाणीटंचाई दूर करून कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी यशस्वी केली. शिर्डी येथे अपर जिल्हा अधिकारी कार्यालयाची निर्मिती, शिर्डी विमानतळावर नाईट लेण्यांची परवानगी व टर्मिनल बिल्डिंगसाठी ५७० कोटीची तरतूद, 

नगर जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन मुलांना शिक्षणासाठी मदत. शिर्डी मतदार संघातील नागरिकांचा मोफत अपघात विमा अशा प्रकारच्या विविध योजना नागरिकांसाठी विखे पाटील यांनी विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री खात्याची जबाबदारी स्वीकारताना पार पाडली त्यांनी ज्या ज्या खात्यात मंत्रिपद भूषवले त्या खात्यात त्यांनी जनहितासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन  उत्कृष्ट कामकाज केले म्हणूनच मंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्याबरोबर केंद्र देखील चर्चा आहे.

अभ्यासू व दूरदृष्टी व्यक्तिमत्व म्हणून तसेच २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अहिल्यानगर जिल्ह्यात चांगले यश मिळून दिल्याबद्दल ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा सातव्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी  निवड होण्याचा मान १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या  मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात मिळण्याचे निश्चित झाल्याने मी राधाकृष्ण विखे पाटील शपथ घेतो की हे बोल कानावर ऐकण्यासाठी विखे पाटील समर्थकांची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचे चित्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे. 

Leave a Reply