शिर्डी दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिर्डी प्रतिनिधी, दि. ५ : शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी राजू उर्फ शाक्या माळी याच्या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने शहरातील काटवणात लपून बसलेल्या आरोपी माळी यास मोठ्या शिताफिने पकडून जेरबंद केले आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने शिर्डी हादरून गेली होती. या प्रकरणी एक आरोपी सोमवारी जर बंद केला होता तर दुसरा आरोपी आहे राजू उर्फ शाक्या माळी फरार होता.

शिर्डी परिसरातच तो पोलिसांना चकवा देत होता अखेर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने काटवणात शिर्डीत लपून बसलेल्या आरोपीला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पकडले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.  

Leave a Reply