पिपल्स बँकेच्या संचालक पदी अनिल कंगले यांची निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : कोपरगाव पिपल्स को-ऑप बँकेचे संचालक कै. सुनिल दत्तात्रय कंगले यांचे दुखःद निधन झाल्याने सर्वसाधारण मतदार संघातील संचालक मंडळाची एक जागा रिक्त झाली होती. त्यानुसार कोपरगाव पिपल्स बँकेने रिक्त झालेल्या जागेबाबत सहकार खात्यांच्या संबंधीत विभागाला माहिती कळवुन रिक्त जागा भरणे बाबत कळविले होते.

त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांचे आदेशानुसार निवडणुक निर्णय अधिकारी एन. जी. ठोंबळ, अध्यासी अधिकारी कोपरगाव यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ रोजी सकाळी ११.०० वाजता कोपरगाव पिपल्स को-ऑप बँक लि. कोपरगावचे सभागृहात निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली.

सदर रिक्त जागेसाठी अनिल दत्तात्रय कंगले व सुधीर सोहनलाल बज या दोन सभासदांनी निवडणुकी करीता अर्ज दाखल केले होते. निवडणुकी करीता दोन अर्ज आल्यामुळे मतदान घेण्यात आले. अनिल कंगले यांना १५ मते व सुधीर बज यांना शुन्य मते मिळाल्यामुळे अनिल कंगले हे विजयी झाले असे निवडणुक निर्णय अधिकारी एन. जी. ठोंबळ, अध्यासी अधिकारी कोपरगाव यांनी जाहीर केले. त्यांना मतदान प्रक्रियेत त्यांचे सहकारी राजेंद्र रहाणे यांनी सहकार्य केले.

 अनिल कंगले हे कोपरगाव तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यापारी असुन त्यांचा शेती पुरक वस्तु विक्रीचा व्यवसाय कंगले सेल्स एजन्सीज या नावाने चालु असुन त्यांचा कोपरगाव पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यांचेवर विविध क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

सदर निवडणुक प्रक्रियेप्रसंगी बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक कैलासचंद ठोळे, रविंद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, सत्येन मुंदडा, सुनिल बंब, दिपक पांडे, सुनिल बोरा, हेमंत बोरावके, वसंत आव्हाड, संचालीका प्रतिभा शिलेदार, त्रिशला गंगवाल हे उपस्थित होते.