अतिक्रमण पिडीतासाठी वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगावातील टपरी धारक, व्यवसायिकांची अतिक्रमणे काढतांना पक्षपातीपणा तसेच गोरगरीब टपरी धारकांना अधिकार्यांनी पदाचा गैरवापर करून दमदाटी करू नये तसेच अतिक्रमणधारक धनदांडग्याना पाठीशी घालू नये याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अहिल्यानगर, सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगाव, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, तहसीलदार शेवगाव,उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव, पोलिस निरीक्षक शेवगाव, शेवगाव नगर परिषद मुख्याधिकारी यांना  लेखी निवेदन देण्यात अले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासकीय नियमानुसार येथील अनेक टपरीधारकांची छोठ्या व्यावसायिकांची टपरी, दुकाने, काढण्यात आली. छोटे किमान २० ते ३० वर्षांपासून हे छोटे व्यवसायिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. आज त्या टपरीधारकांवर, व्यवसाईकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उध्वस्त झालेल्या टपरी धारकांना शासकीय जागा, नगरपालिकेचे खुले सोडलेले भुखंड, त्यावरील अतिक्रमणे शोधून सर्व पिडीत अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई मिळावी.

तसेच शासनाने दिलेल्या १५ मिटर अंतरावरील अतिक्रमणे काढली असून काही बिल्डर लोकांच्या संगणमताने प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शहरातील नगरपालिका व शासकीय जागेवरील ठराविक जागेवरचीच अतिक्रमने काढण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे इतर ठिकाणची अतिक्रमने काढायचीच असल्यास शहरातील सर्व अतिक्रमनाची माहिती घेऊन सरसकट अतिक्रमणे काढावीत.

नियम धाब्यावर बसवून शहरातील मोठमोठ्या व्यवसायिकानी केलेली बांधकामे यांचीही चौकशी करावी तसेच अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमने करून रस्तेच गायब केल्याने ते रस्तेही खुले करावे, जर इतर ठिकाणची अतिक्रमणे काढताना पक्षपातिपाणी आढळून आल्यास वंचित बहुजन आघाडी सर्व पिडीत टपरी धारक व्यवसायिक लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयात बेमुदत आंदोलन करतील असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, वंचितचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, कचरू निकाळजे, बाळासाहेब कोरडे, सुनील हुशार, शौकत सैय्यद, दत्तात्रय निकाळजे, सुभाष पवार,शिवाजी शितोळे, आदिनाथ ढाकणे करिमभाई कुरेशी, प्रसाद कबाडी, जालिंदर ढाकणे, अभिजित निकाळजे, जाकीर कुरेशी, कचरू निकाळजे आदि
सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply