संजीवनीच्या पाच अभियंत्यांची फौरेसिया, इमर्ज सिस्टिम, गोदरेज इन्फोटेक मध्ये निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या पाच नवोदित अभियंत्यांची तीन नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या वार्षिक पगारावर निवड झाली असुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची विद्यार्थ्यांच्या अंतिम निकाला अगोदरच त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवुन देण्याची यशस्वी घौडदौड वेग धरीत आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकातुन देण्यात आली आहे.

 निवड झालेल्या अभियंत्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या सोनाली बाजीराव खर्डे व ऋतुजा सम्राट खर्डे यांचा समावेश  आहे. त्यांना चार चाकी वाहन उद्योगातील फौरेसिया या बहुराष्ट्रीय  कंपनीने सुरूवातीस प्रत्येकी वार्षिक पॅकेज रू ५.५ लाख देवु केले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या गायत्री विलास आढाव हिला इमर्ज सिस्टिम कंपनीने सुरूवातीस वार्षिक पॅकेज रू ५ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे.

गोदरेज इन्फोटेक या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या पुनम रामदास खर्डे व प्रथमेश संतोष सोनवणे यांची सुरूवातीस प्रत्येकी वार्षिक पॅकेज रू ४ लाख देवुन नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये नोकरीस असुन ते प्रत्येक ठिकाणी आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा ठसा उमटवत असुन ते कंपन्यांच्या प्रगती बरोबरच स्वतःचाही उत्कर्ष  साधत आहे.

आपापल्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विविध कंपन्यांची वैश्वासाहार्ता  मिळवित आहे. यामुळे बहुतांशी कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी पसंती देत आहे. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्वांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  

 मी कोपरगांवची रहिवासी मला व माझ्या पालकांना संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमधुन अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले तर हमखास कॉलेजच्या प्रयत्नाने नोेकरी मिळेल असा विश्वास होता, म्हणुन मी मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेत प्रवेश घेतला आणि घडले तसेच. सध्या माझी फौरेसिया या बहुराष्ट्रीय  कंपनीने डीझाईन इंजिनिअर म्हणुन निवड केली आहे. आमच्या कॉलेजला ऑटोनॉमस संस्थेचा दर्जा आहे. यानुसार आम्हाला शेवटच्या पुर्ण सत्रात कंपनीमध्ये इंटर्नशिप  (आंतरवासिता) करणे बंधनकारक आहे. फौरेसिया कंपनीने माझी वार्षिक पॅकेज रू ५.५ लाखांवर नोकरीसाठी निवड तर केलीच परंतु विशेष म्हणजे मला स्टायपेंड देवुन इंटर्नशिपची संधीही  दिली. सध्या मी कंपनीत इंटर्नशिप  करीत आहे. हे सर्व संजीवनीमुळे शक्य झाले. फौरेसिया कंपनी ही बैठक व्यवस्था, दरवाजे व्यवस्था, कारची आतील व्यवस्था, इत्यांदींचे डीझाईन करते. भविष्यात डीझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या चार चाकी वाहनांच्या उत्पादनात मर्यादा येवु शकतात, परंतु इलेक्ट्रिक वाहनांना सुध्दा फौरेसिया कंपनी करीत असलेले उत्पादने लागणारच आहे, त्यामुळे मला भविष्यात माझ्या करीअरला भरपुर संधी आहे आणि मी समाधानी असुन मला माझ्या करीअरसाठी योग्य दिशा  मिळाली आहे. निवड प्रक्रियेमध्ये प्रथम इंजिनिअरींग ड्रॉईंगवर चाचणी झाली. इंजिनिअरची भाषाच ड्रॉईंग असल्यामुळे त्याचे चांगले ज्ञान आम्हाला कॉलेजमधुनच मिळाले. त्यानंतर दोन टेेक्निकल फेऱ्या झाल्या. अंतिम एचआर फेरी झाली आणि माझी नोकरीसाठी निवड झाली. विशेष  म्हणजे स्टायपेंडवर याच कंपनीमध्ये इंटर्नशिप  मिळाली, माझे व माझ्या पालकांनी डोळ्याात साठविलेले स्वप्न  संजीवनीने  पुर्ण केले. -सोनाली खर्डे, निवड झालेली अभियंता