गर्जे हाॅस्पिटल बाल रुग्णा बरोबर कान, नाक घसा उपचारासाठी सज्ज 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : शहरातील प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. अजय गर्जे यांच्या गर्जे हाॅस्पिटल मध्ये कान, नाक, घसा विकाराने ञस्त झालेल्या सर्व वयातील रुग्णांना आधुनिक तंञज्ञानाच्या सहाय्याने २४ तास आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ. पूजा वरद गर्जे देवदूतासारख्या धावून आल्या आहेत. डॉ. पूजा वरद गर्जे ( कराड ) ह्या गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या साईनाथ हाॅस्पिटल व मुंबईच्या प्रसिध्द जेजे हाॅस्पिटलमध्ये कान, नाक व घसा तज्ञ म्हणुन रुग्णांची सेवा केल्याचा मोठा अनुभव असल्याने त्यांच्या वैद्यकीय अनुभवाचा लाभ आता कोपरगाव तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.

 डॉ. अजय गर्जे यांनी गेल्या ३५ वर्षांपासून बाल रोग तज्ञ म्हणून अविरत वैद्यकीय सेवा देत आहेत. बालकांवर उपचार करताना  त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकवेळा अनेकांनी अनुभवले. वैद्यकी क्षेञा बरोबर डॉ. गर्जे यांनी धार्मीक, राजकीय व सामाजीक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांची जनमानसात उजळ प्रतिमा आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा वसा व वारसा पुढे चालवण्यासाठी डॉ. अजय गर्जे यांचे सुपुत्र बालरोग तज्ञ डॉ. वरद अजय गर्जे व  त्यांच्या  सुनबाई प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ. पूजा वरद गर्जे यांनी पुढाकार घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यासह येवला, शिर्डी राहता ,वैजापूर  व इतर भागात २४ तास वैद्यकीय सेवा देणारे कान नाक घसा तज्ञ डाॅक्टर उपलब्ध नसल्याने कान नाक व घशाच्या विकाराने ञस्त झालेल्यांना उपचार करण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. बहुतांश रुग्णांना नाशिक ,पुणे , मुंबई सह इतर शहरात जावं लागतं पण डॉ. गर्जे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांच्या भल्यासाठी डॉ. गर्जे  बाल रुग्णालयात  सर्व वयातील नागरीकांसाठी आधुनिक अद्यावत मिशनरीद्वारे उपचार करणारे कान नाक घशाचे हाॅस्पिटल सुरु करुन डॉ. पूजा गर्जे व डॉ. वरद गर्जे यांच्या रुपाने वैद्यकीय  सेवेत देवदूत आणले आहेत. 

  डॉ. गर्जे चाईल्ड अँड  ई एन टी केअर   हाॅस्पिटल हे पंचक्रोशीत रुग्णांना दिलासा देणारे ठरत आहे. सध्या उपचारासाठी  विविध भागातील रुग्ण येथे  येवून उपचार घेत आहे. डॉ. वरद गर्जे व पूजा गर्जे यांनी नव्या वैद्यकीय तंञज्ञानाच्या जोरावर  रुग्णांबरोबरची जुनी नाती नव्या पिढी बरोबर जोडण्याचे आणि जोपासण्याचे  काम वैद्यकीय सेवा देवुन करीत आहेत.  डॉ. पूजा गर्जे यांच्या प्रदिर्घ अनुभवाच्या जोरावर गर्जे हाॅस्पिटलमध्ये  आजवर शेकडो रुग्णांवर उपचार करुन दिलासा दिला आहे.  कानाचे विकार व आवाज ऐकण्याची तपासनी विशेष अद्यावत मशिनद्वारे केल्याने कानाचे विकार कमी करण्याची त्यांची किमया सर्वांना भावते. 

 नाकाचे सायनसचे  आजार, घोरणे, नाकाचे वाढलेले हाड, डोकेदुखी  तसेच घशासह गळ्यावरील गाठी, थायरॉईड संबंधीत आजार, तोंडातील कॅन्सर व आवाजातील बदल   या आजाराची व कान नाक घसा  तपासणी दुर्बिणीद्वारे करुन Foreign Baby Removal ENT Emergency  सेवा देण्याचे काम गर्जे हाॅस्पिटलमध्ये २४ सुरु असल्याने नागरीकांना त्यांच्या वेळेत उपचार घेत येत आहे. कोपरगाव मधील हे एकमेव हाॅस्पिटल आहे. 

 दरम्यान डॉ. वरद अजय गर्जे हे वैद्यकीय क्षेञातील जाणकार असल्याने मुलांवर योग्य उपचार करुन बालकांच्या पालकांचे मने जिंकली आहेत. अल्पावधीतच डॉ.पूजा गर्जे व डॉ.‌वरद गर्जे यांनी डॉ. अजय गर्जे यांच्या पारंपारीक वैद्यकीय क्षेञाला साजेशी वैद्यकीय सेवा देत असल्याने  गर्जे हाॅस्पिटल सर्वांसाठी वरदान ठरत आहे. वैद्यकीय सेवेची दुसरी पिढी नव्या तंञज्ञानाच्या धर्तीवर उत्तम आरोग्य सेवा देत असल्याने रुग्णासह नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply