आई जगदंबे अतिवृष्टीचे संकट दूर कर – रेणूका कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : आई जगदंबेने अतिवृष्टीचे तालुक्यावरिल संकट दूर करून शेतकऱ्यांसह सर्वांना सुखी ठेवावे. समाजामध्ये शांतता व सलोखा नांदावा, अशी प्रार्थना करत नवयुग प्रतिष्ठानच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संजिवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणूका विवेक कोल्हे यांनी साकडे घातल्याचे मत व्यक्त केले.

कोपरगाव शहराच्या उपनगरातील शंकरनगर येथील नवयुग प्रतिष्ठानच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून संजिवनी स्वयंमसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा  रेणूका  कोल्हे यांच्या हस्ते आरतीचे  आयोजन करण्यात आले होते. धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवयुग प्रतिष्ठानचे संस्थापक सिद्धेश्वर कपिले यांच्या पुढाकाराने संपूर्ण नवरात्र काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांसह विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

गावात सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती पारंपरिक पद्धतीने केली जाते. आरतीनंतर महिलांसाठी दांडिया आणि गरबा करण्यात आले आहे. तसेच संगीत खुर्ची, खेळ स्पर्धा यांसारखे मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे महिलांना एकत्र यायची, परस्परांशी संवाद साधायची आणि सांस्कृतिक परंपरा  संधी मिळत आहे या भागातील महिला वर्गाने मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला असून, नवरात्रोत्सव हा फक्त धार्मिक पूजापुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य आणि आनंदाची पर्वणी ठरला आहे.

महिलांनी गरबा दांडियाच्या तालावर चाललेल्या वातावरणामुळे नगरामध्ये उत्सवाला विशेष रंगत आली आहे. या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष निलेश नन्नवरे, उपाध्यक्ष सुदर्शन वाकचौरे, खजिनदार योगेश कुंडारे  कोषाध्यक्ष दीपेश सावळे, सचिव अनुप  पवार, फंड, अल्पेश सावळे, प्रतीक लोहिया, सिद्धू पवार, प्रितेश जाधव, नयन कुंडारे, ऋषिकेश जंगम, वकील साबळे, गौरव पंडोरे,  वैभव वाघ, शाहिद पठाण, साई महेश भोर,  केतन लोंढे, यश मेहेरखांब, सत्यम मिसाळ, गौरव मिसाळ, गोपी विसपुते आदी तरुणांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

या तरुणांनी कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन आणि महिलांना दिलेली मदत, यामुळे उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पडत आहेत. नगरामध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे सामाजिक एकतेचे दर्शन घडत आहे. धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा मिलाफ घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे शंकरनगर मध्ये नवरात्रोत्सवाचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply