नानासाहेब जगताप यांचे निधन 

‌कोपरगाव  प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव येथील पञकार रविंद्र जगताप यांचे वडील व आंबेडकर चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते नानासाहेब जगताप यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान रविवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुलं, दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

स्व. नानासाहेब जगताप हे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष व कोपरगाव तालुका माजी तालुका अध्यक्ष  आशा अनेक पदांवर राहून चळवळीचे कार्य केले.  ते आदर्श बौद्धाचार्य, आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर विचारांची चळवळीचे काम  गावोगावी सायकलवर फिरून प्रबोधन करीत होते.

स्व जगताप यांच्या  निधनाने सकल आंबेडकर समाजासह त्यांच्या आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली आहे त्यावर कोपरगाव अमरधामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित अनेकांनी जगताप यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केले. 

Leave a Reply