कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : सावळिविहीर पोहेगाव सोनेवाडी या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारने मंजूर केले होते. सदरचे काम नितीन औताडे यांना मिळाले आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून शासकीय कामांना अपुरा निधी मिळाल्याने तसेच यावर्षी मे ते नोव्हेंबर सहा महिने सततचा पाऊस सुरू असल्याने अनेक शासकीय कामे रखडलेली आहे.

यामध्ये सदर रस्त्याचे काम देखील निधी अभावी करता आलेले नाही. महाराष्ट्रातील सर्वच ठेकेदारांची निधी अभावी कामे बंद होती. निधी मिळण्यासाठी आंदोलन देखील झाले होते. डिसेंबर 2025 पासून शासनाकडून बऱ्यापैकी ठेकेदारांना मागील बिले मिळालेले असल्याने आता सर्वांनीच मागील रखडलेले कामे सुरू केले असून सदरचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. सदरचे काम का बंद होते याची सर्व माहिती व जाणीव काकासाहेब जावळे यांच्या नावाने बातमी देणाऱ्यांना आहे.

उभ्या आयुष्यात औताडे यांनी व्यवसायाचे कधीच राजकारण केले नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ बदनामी करण्याचं कटकारस्थान विरोधकांनी केले आहे. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. कोपरगाव नगरपालिकेमध्ये दारुण पराभव झाल्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीत देखील पराभव दिसत असल्याने विरोधक शिवसेना नेते नितीनराव औताडे यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचे कोपरगाव तालुका शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख सिताराम जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

औताडे हे स्वतः इंजिनिअर असून त्यांची कामे दर्जेदार असतात याची जाणीव सोनेवाडी परिसराला आहे. वेळेत व दर्जेदार काम ही त्यांच्या कामाची ख्याती आहे. सोनेवाडी परिसरात विरोधकांनी केलेल्या कामाचा दर्जा देखील तपासावा असे आवाहनही जावळे यांनी केले.
देवस्थानच्या आडून राजकारण करण्याचा विरोधकांनी प्रयत्न करू नये. पोहेगाव ग्रामपंचायत गेल्या 30 वर्षापासून नितीनराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची भागदौड करीत आहे. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही अग्रेसर ग्रामपंचायत म्हणून पोहेगावची ओळख आहे. नाईलाजाने की होईना पण पोहेगावचा विकास हा विरोधकांना मान्यच करावा लागतो.

मयुरेश्वर गणपती मंदिराच्या ट्रस्टची स्थापना नितीनराव औताडे सरपंच असताना त्यांच्याच ना हरकत दाखल्यावर झालेली आहे. सुरुवातीपासून औताडे कुटुंबाचे प्रेम व श्रद्धा या देवस्थानावर आहे. ट्रस्ट नसताना देखील मंदिर परिसरात पाण्याची टाकी व विजेची व्यवस्था औताडे यांनी लोकवर्गणीतून केली असल्याचे कदाचित विरोधकांना माहीत नसावे. गणपती मंदिराला सर्वोतोपरी सहकार्य औताडे करत असतात याची जाणीव पोहेगावकरांना आहे. त्यामुळे देवस्थानच्या आडून तरी राजकारण थांबवले पाहिजे. काकासाहेब जावळे यांच्या आडुन विरोधकांनी पोहेगाव सोनेवाडी सावळिविहिर रस्त्याच्या बाबतीत राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या रस्त्याचे दर्जेदार व उत्कृष्ट काम लवकरच सुरू होणार असल्याचेही जावळे यांनी सांगितले.


