कोपरगाव नगरपरिषदेला २० कोटींचा निधी मंजूर – नगराध्यक्ष संधान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 30 : शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळावी, शहरातील मूलभूत सुविधा सक्षम व्हाव्यात आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी, यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला २० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत कोपरगावच्या विकासासाठी दुष्काळजन्य परिस्थितीत उपायोजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष पराग संधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आ. विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

कोपरगाव शहराच्या आवश्यक असलेल्या विविध कामांसंदर्भात सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता.आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी निधीची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने शहराच्या महत्वाच्या कामांना मोठी चालना मिळणार आहे. यासह दुष्काळाच्या परिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी देखील मोठी मदत होणार आहे.

नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द आज प्रत्यक्षात उतरला आहे. हा निधी म्हणजे केवळ आर्थिक तरतूद नसून कोपरगावकरांना दुष्काळाशी सामना करण्याचा महत्वाचा आधार ठरणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करून गुणवत्तापूर्ण कामे केली जातील. यासह दुष्काळाच्या परिस्थितीत जी महत्वाची कामे मार्गे लावणे आवश्यक असेल त्यासाठी या निधीचा विनीयोग केला जाईल.

कोपरगावच्या विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी महसूलमंत्री, नगरविकास मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने आग्रही मागणी केली त्याची दखल घेतली गेली आहे याबद्दल नगराध्यक्ष संधान यांनी विशेष आभार मानले. शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून कोपरगावच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, व नागरिकांची काळजी घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply