संगमनेरच्या प्रविणची मुंबई क्रिकेट संघात निवड

संगमनेर प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील नांदूरी दुमाला या गावातील नाभिक समाजाचे अण्णासाहेब मदने यांचे चिरंजीव प्रविणभाऊ मदने यांची मुंबई दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया संघात निवड झाल्याने सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यामुळे नाभिक समाजाची मान नक्कीच उंचावली आहे.
छोट्याशा कुटुंबात जन्मलेल्या परिस्थिती हातावरचीच असून वडील सलून व्यवसाय चालवितात.‌ या कठीण परिस्थितीतून चि.प्रविणभाऊने आपले कौशल्य, अपार मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर क्रिडा क्षेत्रात यश संपादन केले. या यशाबद्दल प्रविणचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच मुंबई व महाराष्ट्र हेड ऑफ डीसीसीबीआय क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य  भगवान तलवारे यांची देखील अभिनंदन केले.
या यशाबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष  भगवानजी बिडवे, प्रदेश कार्याध्यक्ष  किरणभाऊ बिडवे, जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष किरणभाऊ बिडवे, प्रवक्ते  किरण मदने, संगमनेर नाभिक एकता महासंघाचे तालुकाध्यक्ष  किशोर बिडवे सर, संगमनेर सलून असोसिएशन अध्यक्ष बाळासाहेब वाघ,संजय जाधव, रंगनाथ बिडवे, गणेश बिडवे व इतर समाजबांधवांनी प्रविणचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *