कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन (उद्योग-संस्था संवाद) विभागाच्या प्रयत्नाने विध्यार्थीनी प्रणाली अशोक चौधरी हिची नोकरीसाठी थेट जपानच्या हांदा हेव्ही इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडने रू १९ लाख (जपानच्या चलनानुसार ३. १२ मिलीयन येन) इतक्या वार्षिक पॅकेज देवुन निवड केली आहे. प्रणाली थोड्याच दिवसात जपानच्या हांदा शहरात असलेल्या कंपनीमध्ये रूजु होणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूएसचे इन्स्टिट्याुटस्चे मॅनेजिंग ट्रस्टी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस् संचलित सर्व संस्थांमधुन नियमित अभ्यासक्रमांबरोबरच जापनीज, जर्मन, चायनीज भाषा शिकविल्या जातात. आत्तापर्यंत या भाषांचा उपयोग पॉलीटेक्निक व इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांना भारतात कार्यरत असलेल्या जपानी व जर्मन कंपन्यामध्ये झाला होता. प्रणालीने एन थ्री लेव्हल पर्यंत जपानी भाषेचे ज्ञान कॉलेजमध्येच पुर्ण केले.
तिची जपानी कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञान व जापनीज भाषा अवगत असलेले अभियंते पुरविणाऱ्या भारतातील कंपनीमार्फत निवड झाली. या कंपनीबरोबर संजीवनीच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागाने सामजस्य करार केलेला असल्यामुळे प्रणालीची जपानला जाण्याची वाट अधिक सुलभ झाली. संजीवनीने तयार केलेले अनेक अभियंते आज जगभर मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. प्रणालीच्या रूपाने त्यात भर पडली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी प्रणालीचे अभिनंदन केले व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमित कोल्हे यांनी प्रणाली, तिचे वडील अशोक चौधरी व आई सौ. पौर्णिमा चौधरी यांना आदरपुर्वक आमंत्रित करून त्यांचा संस्थेच्या सभागृहात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, डॉ. विनोद मालकर व इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ उपस्थित होते.
‘माझे आई वडील चांदे ता. नेवासा येथे शेती करतात. मी स्वतःच्या हिमतीवर पुढे जावे अशी त्यांची इच्छा असायची. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मला जपानी भाषा शिकता आली. कॉलेजने जपान कंपन्यांना मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीशी सामंजस्य करार केलेला असल्यामुळे कंपनीच्या गरजेनुसार विभाग प्रमुख डॉ. क्षिरसागर व इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्रा. मोकळ यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली. विशेष म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये इंडस्ट्रीत जाण्यासाठी ज्या प्रोजेक्टची मदत होईल, असे प्रोजेक्ट करून घेतल्या जाते. माझ्या अंतिम वर्षातील आयओटी तंत्रज्ञानावर आधारीत पोजेक्टचाही निवडीसाठी खुप मदत झाली. एका शेतकऱ्याची मुलगी रू १९ लाख वार्षिक पगारावर थेट जपानला जाते, याचा माझ्या सर्व कुटूंबाला अभिमान आहे. याचे सर्व श्रेय हे माझ्या कॉलेजला जाते. विशेष म्हणजे येथिल व्यवस्थापन किती पुढचा विचार करून विध्यार्थ्यांना घडविते, याचे मी मुर्तीमंत उदाहरण आहे.’- प्रणाली चौधरी