कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर शेतीचा पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष केला, निळवंडे डावा कालवा पाणी चाचणी हे त्यांच्याच कार्य कर्तृत्वाचे फलित असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. शंकरराव कोल्हे आणि शेती पाण्याचा संघर्ष राज्याला परिचित आहे.
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील पोहेगांव परिसराच्या ११ जिरायती गावातील शेतकऱ्यांच्या तीन पिढयांनी निळवंडे कालव्याच्या पाणीप्रश्नी संघर्ष करत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेसह रस्तारोको आंदोलनास साथ दिली. या लढ्याला यश येऊन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री मंडळाने व साईबाबा संस्थानने निळवंडे धरण व त्याचे कालवे होण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देत जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या शेती विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी निळवंडे धरण डावा कालव्याची पाणी चाचणी घेतली. त्या पाण्याचे जलपुजन सोमवारी रांजणगाव देशमुख परिसरातील भागवतवाडी येथे सायंकाळी करण्यात आले त्याप्रसंगी सौ स्नेहलता कोल्हे बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष साईनाथराव रोहमारे होते. प्रारंभी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. भाजपा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास, राहणे यांनी प्रास्तविक केले.
बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी उजनी उपसा सिंचन योजना व निळवंडे पेचप्रसंगातून ११ गावातील जिरायती भागातील शेतकऱ्यांची बाजू शंकरराव कोल्हे यांनी मांडुन त्यांना न्याय मिळवून दिला. धनंजय वर्पे म्हणाले की, आम्ही तरुण युवक असल्याने निळवंडे धरण कालव्याची आंदोलने अनुभवली आज त्याच कालव्यात पाणी पाहून आमच्यासह शेतकरी धन्य झाले आहेत.
कोल्हे पुढे म्हणाल्या की, पाटपाणी संघर्ष, रस्तारोको या साऱ्यांची अनुभूती सासरे स्व शंकरराव कोल्हे यांच्याकडून शिकायला मिळाली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची हृदयाची शस्त्रक्रिया ठरली असतानाही त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून निळवंडे प्रश्नी २३ मे २०१२ रोजी निर्मळपिंपरी येथे रस्तारोकोत सहभाग दिला या प्रसंगाची आज आठवण आली तरी शरीरावर काटा उभा राहतो. शेती आणि कार्यकर्त्यांची नाळ तुटू नये आणि लाख मोलाची मिळवलेली माणसं कायम बरोबर असावी याची सातत्याने स्व शंकरराव कोल्हे यांना जाणीव होती म्हणूनच हे निळवंडे धरण झाले.
केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे आहे. ग्रामीण भागातील रहिवासीयांना पिण्यांसाठी पाणी महत्वाचे असुन जलजीवन मिशन अंतर्गत कोपरगांव विधानसभा मतदार संघातील असंख्य योजना मार्गी लागल्या आहेत. निळवंडे जिरायती भागातील ११ गावातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी वितरीका क्रमांक ३, ४ व ५ त्याचबरोबर उपवितरकांची कामे तात्काळ माग लावून पावसाळ्यात याभागातील बंधारे, शेततळी गावतळी, ओढे, नाले पाण्याने समृद्ध होण्यासाठी ती भरून घेण्यांवर आपला भर राहिल असेही त्या शेवटी म्हणाल्या.
याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले,अरुणराव येवले, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, संजयराव औताडे, रमेश आभाळे, बापूसाहेब बारहाते, बापूसाहेब औताडे, प्रकाश गोर्डे ,बाळासाहेब गोर्डे, बाजार समितीच्या संचालिका माधुरी डांगे, वैशाली साळुंखे, शरद थोरात, ,विजय डांगे, दत्तात्रय गुंजाळ, चंद्रभान गुंजाळ, बाबासाहेब नेहे, एकनाथ दरेकर, सुलेमान सय्यद, वाल्मीक कांडेकर, रमेश रहाने, आप्पासाहेब रहाणे, दिगंबर कांडेकर, राजेंद्र कोल्हे, सुरेश पाडेकर, कानिफ गुंजाळ आदी उपस्थित होते, शेवटी सुनील कांडेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचलन विक्रम पाचोरे यांनी केले.