बोरी ग्रामपंचायतमध्ये ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वृक्षांची लागवड

श्रीगोंदा प्रतिनिधी, दि. १४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोरी ग्रामपंचायत मध्ये अमृतवाटीका वसुधा वृक्षसंर्वधन योजना अंतर्गत विविध जातीचे ७५ वृक्षांचे वृक्षरोपन सरपंच सुमनबाई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आसवले, काका सोनवणे, ग्रामसेविका श्रीमती. आर. बी. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी आकाश आढगळे, शिवाजी थोरात, सामाजिक कार्यकर्ते संभाजी वाळुंज, संजय थोरात आदी उपस्थित होते.

दरम्यान ग्रामपंचायत परिसरामध्ये कडू निंब, चिंच, आंबा, या सारख्या ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षरोपणानंतर त्याचे संवर्धन व्हावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून, रोपाला भक्कम व आकर्षक अशा लोखंडी जाळ्या बसवून त्यांना वेळच्या वेळी पाणी द्यायची कायम स्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती मार्फत सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

यावेळी सरपंच सुमनबाई थोरात म्हणाल्या कि, सध्या वृक्षांची संख्या कमी होत असल्याने प्रत्येक नागरिकाने एक झाड घरासमोर लावून या अमृतवाटीका वसुधा वृक्षसंर्वधन योजनेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. झाडांची संख्या वाढली, तर गावालाच त्याचा फायदा होणार आहे, असे त्या म्हणाल्या.