कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : कोपरगाव शहरातील एक अजब चोरांची गजब घरफोडी उघड झाली आहे. कोपरगाव शहरातील बेट भागातील एक तरुन भल्या पहाटे पासुन लोकांच्या दारोदारी जावून नागरीकांना दूध देते. पिशवीतील भेसळ दूध खाण्यापेक्षा घरगुती चांगले नीरसं दूध आणि तेही घरपोच मिळत असल्याने बहुतांश नागरिकांनी शहरातील बेट भागात रहाणाऱ्या महेश मोहन सोनवणे याच्याकडून दूध घेवू लागले. दररोज नियमितपणे दूध देणारा महेश सोनवणे प्रामाणिक असल्याची खाञी अनेकांना पटली होती. महेश सोनवण याने दूध देवून अनेकांची मने जरी जिंकत असला तरी त्याच्या मनात माञ वेगळंच होतं, हे कोपरगावच्या नागरीकांना समजलेच नाही.
भल्या पहाटेपासून महेश सोनवणे शहरातील विविध भागात दूध देता देता कोणाचे घर बंद आहे, कोणी कधी बाहेरगावी गेले. बाहेरगावी गेलेले संबंधीत किती दिवसांनी परत येतात, याची माहिती घेत होता. दूध देताना कधी कधी शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही सहानुभूती पुर्वक विचारायचा की, हे बाहेरगावी गेले का? यांच घर बंद आहे, कधी परत येणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार घर बंद असल्याची खाञी सकाळी करुन घ्यायचा आणि जमलं तर चक्क दुपारीच आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने घरफोडी करुन घरातील ऐवज लुटला जायचा.
दिवसा एखाद्या मोठ्या इमारतीत अनेक कुटुंबे राहत असले तरी कोणी पाहिले तरी ओळखीचा दूध घालणारा आहे. बिलासाठी किंवा इतरांना भेटण्यासाठी आला असावा म्हणून दुर्लक्ष केले जात होते. याचा वारंवार गैरफायदा घेवून महेश सोनवणे आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. आत्तापर्यंत त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अनेक मोटारसायकली चोरून त्याच मोटारसायकलवरून दिवसा व राञी घरफोड्या करण्याचे सञ सुरु केले. घरफोडी झाल्याची तक्रार नागरीक पोलीसांकडे करायचे पण पोलीसांना चोरांचा शोध लागत नव्हता.
पोलीसांच्या रडारवर असलेल्या चोरांकडे पोलीस जावून चौकशी करायचे माञ त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. सतत चोऱ्या होत होत असल्याने नागरिक दिवस राञ चिंतेत तर चोर सापड नसल्याने पोलीस वैतागले होते. कोणीही या चोरांना चोर म्हणणार नाही अशा पध्दतीने चोरी करणारी चतूर चोरांची टोळी कोपरगावमध्ये कार्यरत झाली. चोरांनी कितीही चतुराई केली तरी एक दिवस पोलिसांपर्यंत त्यांची चतुराई पोहचते अखेर कोपरगाव शहर पोलीसांनी या चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आणि दूध घालणाऱ्यासह त्याच्या साथीदारांना मुद्देमालासह गजा आड केले.
एका दूध घालणाऱ्या चोरट्यामुळे सकाळी घरोघरी दूध देणारे सर्व दूधवाले चोरटे नाही तर ते खुप प्रामाणिक आहेत. तेव्हा नागरिकांनी यापुढे दूधवाल्यांकडे त्या नजरेने बघु नये पण किमान भामटे ओळखावे. सतर्कता बाळगावी बाहेरगावी जाताना पोलिसांना व माहिती द्यावी मौल्यवान ऐवज सुरक्षित ठेवावा. नाहीतर आपल्या घरावर पाळत ठेवणारा घरफोडी करतोय हे निश्चित आहे.